महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Fake Food Safety Officers Arrested : दोन तोतया फुड सेफ्टी अधिकाऱ्यांना अटक ; कस्तुरबा पोलीसांची मोठी कामगिरी - कस्तुरबा पोलीस

फूड सेफ्टी अधिकाऱ्याची असल्याचे सांगून हॉटेल मालकांकडून पैसे उकळणाऱ्या बनावट अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली (fake food safety officers arrested within 24 hours) आहे. ही कामगिरी कस्तुरबा पोलीसांनी केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला (arrested by Kasturba Police) आहे.

Fake Food Safety Officers Arrested
बनावट अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अटक

By

Published : Dec 6, 2022, 10:27 AM IST

मुंबई :मुंबईतील विविध हॉटेल व्यवसायिकांना एफडीए अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून खंडणी उकळणाऱ्या दोन तोतया फूड सेफ्टी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली (fake food safety officers arrested) आहे. मुंबईचा कस्तुरबा मार्गपोलीसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासात या दोन आरोपींना अटक केली आहे. धर्मेश प्रकाश शिंदे (२५ वर्षे) आणि वर्धन रमेश साळुंखे उर्फ अविनाश गायकवाड (२८ वर्षे) अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे (arrested by Kasturba Police within 24 hours) आहेत.

बनावट अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अटक

घटना कशी घडली :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली राजेंद्र नगर भागातील सेंट्रल प्रभूमध्ये चार डिसेंबर रोजी सकाळी साधारणपणे सव्वा अकरा वाजता धर्मेश शिंदे व अविनाश गायकवाड उर्फ वर्धान साळुंखे या दोन व्यक्तींनी प्रवेश केला. व फूड सेफ्टी अधिकाऱ्याची असल्याचे सांगून हॉटेलचे मालक तेजस हेगडे यांचेकडुन रु. ५,००० व आरोही हॉटेल मॅनेजर तंगमनी केरमडा यांचेकडुन रु. ४,००० घेऊन निघून (fake food safety officers arrested within 24 hours) गेले.

पोलीस ठाण्यात तक्रार :मात्र यानंतर संशय आल्याने हॉटेलच्या मॅनेजर असलेल्या संतोष श्रीधर शेट्टी यांनी या दोघांविरोधात कस्तुरबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर अवघ्या 24 तासात दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली असून अशाप्रकारे अन्य व्यावसायिकांची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करत (Kasturba Police) आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details