कुर्ला परिसरातून दोन अमलीपदार्थ तस्करांना अटक; एनसीबीची कारवाई
अटक करण्यात आलेला जाकीर हुसेन शेख याला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून २०१० व २०११ मध्ये विविध गुन्ह्यांखाली अटक झालेली होती. मात्र, जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा अंमली पदार्थांच्या वितरणाचे काम सुरूच ठेवले.
मुंबई- कुर्ला परिसरात आमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन कुख्यात तस्करांना एनसीबीकडून अटक करण्यात आली. हे आरोपी गेल्या काही वर्षापासून बांद्रा. कुर्ला आणि दक्षिण मुंबईतील काही भागात आमली पदार्थाची तस्करी करत होते. जाकीर हुसेन शेख उर्फ बबलू पत्री व सहाब अली मोहम्मद हनीफ मुल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आगोदरही एका आरोपीला झाली होती अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २० किलो कोडेन कप सिरप, ५६ ग्राम एमडी अमली पदार्थ व ४५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेला जाकीर हुसेन शेख याला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून २०१० व २०११ मध्ये विविध गुन्ह्यांखाली अटक झालेली होती. मात्र, जामिनावर सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा अंमली पदार्थांच्या वितरणाचे काम सुरूच ठेवले. एनसीबकडून करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान या आरोपींनी वापरलेली चार चाकी वाहन सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे.