मुंबई - शहरातील मरीन लाईन्स येथे समुद्रात दोन जण बुडाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, त्याला जी. टी. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टारांनी त्याला मृत घोषीत केले. जावेद खान (वय २२) असे मृताचे नाव आहे. मात्र, अद्याही दुसऱ्याचा शोध लागलेला नाही. त्यासाठी पाणबुड्यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन विभागाने सांगितले.
मरीन लाईन्स येथे समुद्रात 2 जण बुडाले; एकाचा मृत्यू, तर दुसऱ्याचा शोध सुरू - मरीन लाईन्स
समुद्रात खेळणारे दोन जण पाण्यात बुडाल्याचे समजताच पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पाणबुड्यांच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू केली. एका तरुणाला बाहेर काढण्यात आले. मात्र, दुसरा लहान मुलाचा अद्यापही शोध लागलेला नाही.
मरिन लाईन्स येथील समुद्रकिनारी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. आज शनिवार असल्याने मरिन लाईन्सच्या समुद्रकिनारी जास्तच गर्दी होती. समुद्राला असलेल्या लाटांची मजा घेत असताना एक लहान मुलगा पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी एका तरुणाने पाण्यात उडी मारली. मात्र, समुद्रात मोठ्या लाटा असल्याने दोघेही बुडाले. इतर पर्यटकांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आपत्कालीन विभाग अग्निशमन दलासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच काही पाणबुड्यांनाही बोलावण्यात आले. अग्निशमन दल आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने दोघांचाही शोध घेणे सुरू आहे. एकाचा शोध लागला असून अद्यापही मुलांचा शोध न लागल्याने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शोध घेणे सुरू आहे.
दरम्यान या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली झाली. त्यामुळे पोलिसांना त्यांना हटवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत आहे. तसेच आता अंधार झाल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.