मुंबईGas in fishing boat: आज मंगळवारी यल्लो गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्यू फिश जेटी या ठिकाणी मच्छीमार नौकेत वायू पसरल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली आहे. याप्रकरणी यल्लो गेट पोलीस ठाण्यात सध्या अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती देखील पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली आहे.
मच्छीमार नौकेत कुजक्या माशांच्यामुळे तयार झाला गॅस, दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक - नौकेत वायू पसरल्याने दोघांचा मृत्यू
Gas in fishing boat मासेमारी करणाऱ्या बोटीवर कुजक्या माशांच्यामुळे दोघांचा बळी गेलाय. मासे काढण्यासाठी हे ५ मच्छीमार बोटीवरील तळघरात गेले. त्यावेळी कुजक्या माशांच्यामुळे तयार झालेल्या गॅसमध्ये ते गुदमरले. त्यातच दोघांचा मृत्यू झाला.

Published : Dec 26, 2023, 10:00 PM IST
आज २६ डिसेंबरला यलो गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्यू फिश जेटी येथे मच्छीमार नौका अंजनी पुत्र IND-MH-7-MM-1664 ही किरणभाई इश्वरभाई तांडेल (वय 43) यांनी पहाटे दोन वाजता धक्क्यावरती बोट आणली. त्यानंतर बोटीमधील खणातील सकाळी 11 वाजताच्या सुमारास मच्छी काढण्यासाठी मच्छिमार उतरला होता. मात्र वायू गळती झाल्याने मच्छीमार बेशुद्ध पडला. त्याला बघण्यासाठी दुसरा मच्छीमार गेला असता तो बेशुद्ध पडला असे एकामागोमाग एक एकूण सहा जण बेशुद्ध पडल्याने त्यांना जे जे रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. जे जे रुग्णालयात श्रीनिवास आनंद यादव वय - 35 आणि नागा डॉन संजय यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित करण्यात आलं होतं.
त्याचप्रमाणे सुरेश निमुना मेखला (वय २८) हा व्हेंटिलेटरवर असून अन्य तिघे जण जे जे रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिली आहे. मृत श्रीनिवास आनंद यादव हा आंध्र प्रदेशातील अनर्पुर येथील राहणारा असून नागा डॉन संजय हा बोटीचा बोट मालक असून आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे राहणारा आहे. तर सुरेश निमुना मेकला वय 28 हा व्हेंटिलेटरवरील इसम आंध्र प्रदेशातील कर्नुल येथील राहणारा आहे. या प्रकरणी यलो गेट पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बोटीतील मासे कुजल्याने निर्माण झालेल्या वायूमुळे ही दुर्घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यलो गेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरला वसावे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, मच्छीमार नौका असलेल्या अंजनी पुत्र IND-MH-7-MM-1664 या बोटीत मच्छी बाहेर काढण्यासाठी गेलेले मच्छीमार एका पाठोपाठ एक गेल्याने वायूचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यातच ही दुर्घटना घडली.