मुंबई -कोरोनाचा सामना करण्यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस दिवस-रात्र काम करत आहेत. लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी महत्त्वाची भूमिका निभावली. नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलालाही कोरोनाने विळखा घातला आहे. गेल्या 24 तासात 2 कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या राज्यातील पोलिसांचा आकडा 62 वर गेला आहे.
गेल्या 24 तासात 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यात आतापर्यंत ६२ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू - कोरोना पॉझिटिव्ह पोलीस कर्मचारी
नागरिकांचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलालाही कोरोनाने विळखा घातला आहे. गेल्या 24 तासात 2 कोरोनाग्रस्त पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या राज्यातील पोलिसांचा आकडा 62 वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजून 1 हजार 18 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 125 पोलीस अधिकारी व 893 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
![गेल्या 24 तासात 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू; राज्यात आतापर्यंत ६२ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू Maharashtra Police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7859035-thumbnail-3x2-police.jpg)
राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजून 1 हजार 18 कोरोनाबधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 125 पोलीस अधिकारी व 893 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुर्दैवाने आत्तापर्यंत 3 पोलीस अधिकारी व 59 पोलीस कर्मचारी अशा एकूण 62 पोलिसांचा मृत्यू झाला.
दरम्यान, लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 41 हजार 63 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मुंबई वगळता राज्यात क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्या 783 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या काळात पोलिसांवर हल्ले होण्याच्या 291 घटना घडल्या असून या प्रकरणी आत्तापर्यंत 860 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 86 पोलीस जखमी झाले. कोविड-19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 5 हजार 516 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत. तर अवैध वाहतुकीच्या 1 हजार 335 प्रकरणात 29 हजार 488 जणांना अटक करण्यात आली आहे. 86 हजार 651 वाहने पोलिसांनी जप्त केली असून तब्बल 10 कोटी 21 लाख 40 रुपयांचा दंड पोलिसांनी जमा केला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 54 घटना घडल्या आहेत.लिसांनी थोटावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 54 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.