आरोपींना अटक करून नेताना पोलीस मुंबई: 17 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास विलेपार्ले पश्चिमेकडील गुलमोहर रोड नंबर सात या परिसरात पायी चालणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील चेन खेचून पळ काढला. याबाबत फिर्यादीने मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. या तपास दरम्यान पोलिसांनी तब्बल 100 पेक्षा अधिक सीसीटिव्ही तपासून तांत्रिक कौशल्याचे आधारे दोन्ही आरोपींना नालासोपारा परिसरातून अटक केली आहे.
मुद्देमाल जप्त :आरोपी हे नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या बाहेर येणार अशी माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे सपोनि विजय धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने नालासोपारा परिसरात सापळा लावला. सलग 36 तास तेथे पाळत ठेवून दोन्ही आरोपीस नालासोपारा परिसरातून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपी सुनील सकपाळ विरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये 40 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असून दुसरा आरोपी सुरेश निषाद याच्यावर वीसपेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. या दोघांना जुहू पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली बाईक देखील जप्त करण्यात आली आहे.
साखळी चोराला अटक :सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीद वाक्याची प्रचिती वाळवा तालुक्यातील नागरिकांना अनुभवायला मिळाली. कर्तव्यावर नसतानादेखील एका पोलीस कॉन्टेबलने गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न केला. वाळवा येथील एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या दुचाकीवरील चोरट्यांचा पाठलाग करून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास 13 जुलै, 2020 रोजी मदत केली.
कर्तव्यावर नसतानाही चोराला पकडले :राजेंद्र देवळेकर असे त्या कर्तव्यनिष्ठ पोलिसाचे नाव आहे. राजेंद्र देवळेकर हे वाळवा गावचे असून वाळवा तालुक्यातील कुरळप पोलीस स्टेशनला पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. शनिवार (दि.11) देवळेकर हे साप्ताहिक सुट्टी असल्याने आपल्या वाळवा नागठाणे रोड लगत असणाऱ्या शेतात काम करत होते. या वेळेस सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास याच रस्त्याने मालती नेमगोंडा पाटील (वय 78) या नातवासोबत शेतातून घरी जात होत्या. त्यावेळी ३ अनोळखी दुचाकीस्वार तोंडाला रुमाल बांधून आले व मालती यांना कोल्हापूरकडे कसे जायचे, हे विचारू लागले. त्याचवेळी आजू बाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांच्यातील एकाने आजीच्या गळ्यातील 4 तोळ्याची मोहन माळ तोडली.
20 कि.मी. पर्यंत केला पाठलाग :मालती यांनी आरडा ओरडा केली. मात्र, तोपर्यंत हे तिघांनी दुचाकीने पळ काढायला सुरुवात केली. मालतीबाईंचा आरडा-ओरडा ऐकून जवळच शेतात काम करणाऱ्या देवळेकर यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यावेळी मालतीबाईंनी मंगळसुत्र चोरीची माहिती देताच देवळेकरांनी त्या तिघांचा मोटारसायकल वरून पाठलाग केला. पाच सहा किलोमीटर दूर गेल्यावर या तिघांनी देवळेकरांच्या गाडीवर दोन वेळेस लाथाही मारल्या. पण देवळेकर घाबरले नाहीत, अशा गडबडीत त्यांनी आष्टा पोलिसांना फोनही केला शिवाय देवळेकर यांनी आपले सहकारी पो.ह. सूर्यकांत कुंभार यांना व्हिडिओ कॉल केला, हा सर्व थरारक पाठलाग लाईव्ह सुरू ठेवला. हवालदार कुंभार यांनीही त्यांना त्यांचा पाठलाग करण्यासंदर्भात सूचित केले. अखेर २० किमी अंतर पार पडल्यानंतर त्या तीन चोरांनी देवळेकर आपल्याला सोडणार नाही, या विचाराने गाडी रस्त्यावर टाकून ऊसातून पळ काढला, देवळेकर यांनी आष्टा पोलिसांना बोलावून गाडी ताब्यात दिली.
हेही वाचा:Mumbai Crime : 1 कोटी 30 लाख रुपयांचे हेरॉईन जप्त; एकास अटक