मुंबई :सध्या दिवसेंदिवस फोटो मॉर्फिंग करून पैसे कमावण्याचे गुन्हे वाढत आहेत.सांताक्रुझ पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी यांना विरार आणि आसाम येथून अटक केली आहे. 25 वर्षीय युट्युबर तक्रारदार महिलेचे रेडीट साईटवर न्युड माॅर्फ फोटो अपलोड केले. त्या न्युड माॅर्फ फोटोचे पैसे घेऊन विक्री केली. तसेच फेक इंन्स्टाग्रम प्रोफाईल बनवुन त्यावर न्युड माॅर्फ फोटो अपलोड करुन फिर्यादीची इंन्स्टाग्रम साईटवर बदनामी केली, म्हणुन सांताक्रुझ पोलीस ठाण्यात कलम 354 (ड), 509 भारतीय दंड विधान सह कलम 67, 67(अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
इन्स्टाग्रामवर तक्रारदाराचे फेक प्रोफाईल :हा गुन्हा 9 सप्टेंबर 2022 ते 18 ऑक्टोबर 2022 दरम्यान घडला होता. आरोपीने इन्स्टाग्राम साईटवर तक्रारदाराचे फेक प्रोफाईल तयार केला होते. त्या संदर्भात तांत्रीक विश्लेषण केले असता आरोपी आसाममधील असल्याचे दिसुन आले. रेडीट साईटवर फिर्यादीचे न्युड माॅर्फ फोटो अपलोड केले होते. त्या मोबदल्यात पैसे आरोपीने गुगल पेवर घेतले. त्याचे तांत्रीक विश्लेषण केले असता सदर आरोपीचा पत्ता हा वसई विरार येथील प्राप्त झाला.