महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील कुकरेजा पॅलेस सोसायटीत समोसा पार्टीचे आयोजन; दोघांंना अटक - Mumbai Samosa Party News

मुंबईतील कुकरेजा पॅलेस या इमारतीत राहणाऱ्या 30 ते 40 जणांनी एकत्र येऊन सोसायटीच्या आवारातच जंगी समोसा पार्टी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी करण्यात आली आहे मात्र, तरीही काही नागरिकांना या समोसा पार्टीचे आयोजन केले. दोन आयोजकांना पोलिसांनी अटक केली आहे.

Samosa party
समोसा पार्टी

By

Published : May 20, 2020, 1:24 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही नागरिक त्याचे गांभीर्य जाणत नाहीत. ते सगळे नियम धाब्यावर बसवून एकत्र येण्यासाठी काहीतरी कारण शोधतातच. मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुकरेजा पॅलेस या उच्चभ्रू सोसायटीतही असाच काहीसा प्रकार घडला.. त्यांना लॉकडाऊनच्या काळात समोसा पार्टीचे आयोजन केले. मात्र, याची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तेथे दाखल होऊन आपला हिसका दाखवला.

18 मे ला रोजी कुकरेजा पॅलेस या इमारतीत राहणाऱ्या 30 ते 40 जणांनी एकत्र येऊन सोसायटीच्या आवारातच जंगी समोसा पार्टी केली. या पार्टी दरम्यान सोसायटीत राहणाऱ्या काही युवकांनी गिटार वाजवली तर तर काही जणांनी लाऊड स्पीकरवर सूर आळवले. भाजपाचे माजी आमदार प्रकाश मेहताही याच सोसायटीत राहत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या घटनेबद्दल त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.

या सर्व प्रकरणाची कुणकुण पंत नगर पोलिसांना लागली. पोलिसांनी कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर या समोसा पार्टीचे आयोजन करणाऱ्या 2 व्यक्तींना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details