महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध गुटख्याची वाहतूक; दोघांना अटक - Mumbai

पोलिसांनी २१ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा व २४ लाख रुपयांचे दोन टेम्पो, असा एकूण ४८ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मोहम्मद आदील मोहम्मद तारीख शेख (वय.२५) व दादाराव ज्ञानोबा काळे (वय.४४) अशा दोन्ही टेम्पोचालकांना अटक करण्यात आली आहे.

mumbai
अटक केलेल्या आरोपी

By

Published : Dec 3, 2019, 1:24 PM IST

मुंबई- मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून एकूण २४ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून २४ लाख रुपयांचे दोन टेम्पो, असा एकूण ४८ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुजरातहून मुंबईच्या दिशेने अवैध गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे वाहनांची झडती घेत असताना पथकाला (एम.एच.०५/ए.एम.४०४४ व एम.एच ४८/ए.वाय.८२५४) क्रमांकांच्या दोन टेम्पोमध्ये अवैधरीत्या वाहतूक होत असलेला गुटखा आढळून आला.

याप्रकरणी पोलिसांनी २१ लाख ७१ हजार रुपयांचा गुटखा व २४ लाख रुपयांचे दोन टेम्पो, असा एकूण ४८ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मोहम्मद आदील मोहम्मद तारीख शेख (वय.२५) व दादाराव ज्ञानोबा काळे (वय.४४) अशा दोन्ही टेम्पोचालकांना अटक करण्यात आली आहे. अवैध गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांविरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा-'आरे'नंतर बुलेट ट्रेनबाबतही मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील- मनीषा कायंदे

ABOUT THE AUTHOR

...view details