मुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईदरम्यान 11 किलो गांजासह दोघांना अटक केली आहे. ऋषी मिश्रा (21) व शुभम मिश्रा (23), असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. हे दोघे संचारबंदीदरम्यान मोटरसायकलवरून गांजाची होम डिलिव्हरी करत होते.
मोटर सायकलवरून गांजाची डिलिव्हरी -
संचारबंदीदरम्यान अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मोटर सायकलवरून काही जण गांजाची घरपोच डिलिव्हरी देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या संदर्भात सापळा रचत दोघांना अंधेरी पूर्व येथील सलीम कंपाऊंड चीमन पाडा या ठिकाणाहून अटक केली. त्यांच्याकडून 2 लाख 75 हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे समाजमाध्यमांचा वापर करून गांजाची होम डिलिव्हरी करत होते. या दोन आरोपींच्या अटकेनंतर आणखीन किती जण अशा प्रकारच्या अमली पदार्थ विक्रीच्या प्रकरणात सहभागी आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - हेड कॉन्स्टेबल सुखबीरने 'सेवा, सुरक्षा और सहयोग' ला प्रत्यक्षात उतरवले