मुंबई- कोरोना चाचणी निगेटिव्ह बनवून देणाऱ्या दोन आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10ने अटक केली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील कुलाबा प्लॉट येथील अब्बास चाळ येथे ही कारवाई करण्यात आली. मोबाइल फोन आणि लॅपटॉपच्या सहाय्याने हे दोघे बनावट चाचणी अहवाल देत होते.
मुंबईत बनावट कोविड रिपोर्ट बनविणाऱ्या 2 आरोपींना अटक - meghawadi police station
जोगेश्वरी पूर्व येथील कुलाबा प्लॉट येथील अब्बास चाळ येथे ही कारवाई करण्यात आली. मोबाइल फोन आणि लॅपटॉपच्या सहाय्याने हे दोघे बनावट चाचणी अहवाल देत होते.

आरोपीला अटक
कृष्णा डायग्नोस्टिक व लाइफ केअर डायग्नोस्टिक या दोन लॅबच्या नावाखाली फेरफार करून निगेटिव्ह अहवाल देत होते. तसेच गुगल पेच्या माध्यमातून ग्राहकांकडून अधिकची रक्कम घेवून फसवणूक करत होते. यासंदर्भातील माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार कुलाबा प्लॉट येथे छापा टाकून दोघांना अटक करण्यात आली. यासंदर्भात मेघवाडी पोलीस ठाण्यात कलम 420, 465, 468, 471, 34सह गुन्हा नोंदविण्यात आला आहे.