मुंबई (मलाड) :एटीएममध्ये एरर तयार करून बँकांना गंडा (Bank Fraud Creating Errors In ATM) घालणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली (Error creator In ATM arrested) आहे. एटीएममधून पैसे काढून टेक्निकल एरर तयार करून पैसे मिळालेच नसल्याचा दावा बँकांकडे करून आरोपी बँकांना गंडवून (Fraud with Bank) बँकेकडे पैसे मागत असत. (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)
Bank Fraud : एटीएममध्ये एरर तयार करून बँकांना गंडवले; दोन आरोपींना अटक - Bank Fraud Creating Errors In ATM
एटीएममध्ये एरर तयार करून बँकांना गंडा (Bank Fraud Creating Errors In ATM) घालणाऱ्या दोन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली (Error creator In ATM arrested) आहे. एटीएममधून पैसे काढून टेक्निकल एरर तयार करून पैसे मिळालेच नसल्याचा दावा बँकांकडे करून आरोपी बँकांना गंडवून (Fraud with Bank) बँकेकडे पैसे मागत असत. (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)
![Bank Fraud : एटीएममध्ये एरर तयार करून बँकांना गंडवले; दोन आरोपींना अटक Bank Fraud Creating Errors In ATM](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16713217-thumbnail-3x2-atmfraudesterarrested.jpg)
वॉचमन नसलेल्या एटीएममध्ये करायचे घोळ-झोन 11 चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑक्टोबर रोजी मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका एटीएम सेंटरमध्ये दोन जण छेडछाड करत असल्याची तक्रार मालाड पोलिसांना गोपनीय सूत्रांनी दिली. यानंतर ताबडतोब घटनास्थळावर जाऊन दोन व्यक्तींना मालाड पोलिसांनी ताब्यात घेतले यानंतर दोघांना विचारपूस केली असता दोघेही हरियाणा येथील रहिवासी असल्याचे समजले. ज्या एटीएम सेंटरमध्ये सीसीटीव्ही आणि वॉचमन उपलब्ध नसेल अशाच एटीएम सेंटरला ते निशाणा बनवत असे. (ATM fraudsters arrested in Mumbai)
गुन्हा करण्यासाठी विमानाने यायचे -आरिफ खान आणि राशिद खान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघेही हरियाणाचे राहणारे आहेत. दोन्ही आरोपी गुन्हा करण्यासाठी खास विमानाने मुंबईत यायचे आणि गुन्हा करून पुन्हा विमानाने हरियाणाला जात असे. पोलिसांनी या दोघांकडून तीस हजार आणि 68 एटीएम कार्ड जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेली सर्व एटीएम कार्ड आरोपींच्या ओळखीतील लोकांची आहेत. गुन्ह्यातील काही रक्कम आरोपी एटीएम कार्ड धारकांना देखील देत असत.