महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मनसे नेते संदीप देशपांडे विरुद्ध युवासेना नेते वरुण सरदेसाई यांच्यात ट्विटर वॉर - युवासेना नेते वरुण सरदेसाई मनसे नेते संदीप देशपांडे वाद

वीरप्पनने जेवढे लोकांना लुटले नसेल त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटले आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असे ट्विट सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते.

मुंबई
मुंबई

By

Published : Jan 29, 2021, 4:11 PM IST

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू आहे. शिवसेनेला ट्विटरवरून वीरप्पनची उपमा दिल्यानंतर भडकलेल्या वरुण सरदेसाई यांनीदेखील ट्विट करत संदीप यांना प्रतिउत्तर दिले आहे.

मुंबई

वीरप्पनने जेवढे लोकांना लुटले नसेल त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटले आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल, असे ट्विट सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते. या ट्विटने घायाळ झालेल्या वरून सरदेसाई यांनी देशपांडे यांना खरे वीरप्पन कोण आहेत हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्याला पण माहीत करून घ्यायचे असेल तर 'मनसे खंडणी' असे फक्त 'गुगल सर्च' करून बघावे. गुगलच्या पहिल्या पानावर ह्या बातम्या सापडतील. टीप - सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील ह्यांची 'स्टोरी सेम टू सेम' असे प्रतिउत्तर दिले आहे. तसेच यानंतर अमित यांच्या पत्नी आणि राज ठाकरे यांच्या सूनबाई मिताली ठाकरेही मनसेच्या बांद्रा येथील राज्यव्यापी बैठकीला आल्या होत्या. या ठाकरे कुटुंबाच्या हजेरीवरूनही त्यांनी निशाणा साधला. शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी असे म्हणत वरून यांनी मनसेवर टीका केली आहे.

ट्विटबाबत काय म्हणतात संदीप देशपांडे

- मी जे ट्वीट केले त्यात कुठेही शिवसेनेचा उल्लेख केला नव्हता. तसेच मुंबई महानगरपालिकेचे नावही कुठे घेतले नव्हते. मग वरुण सरदेसाई यांना का लागले. ट्विट करून सरदेसाई यांनी वीरप्पन कोण आहे, हे जाहीर केले आहे. आतातरी लोकांना कमी लुटा असा टोलाही देशपांडे यांनी सेनेला लगावला आहे. वरूण सरदेसाई यांनी फार बोलू नये, मी बोललो तर त्रास होईल. त्यांच्या पक्षातील लोकांचीही कात्रणे आहेत. वडापावसाठी यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती, असेही देशपांडे यांनी सांगितले. मिताली ठाकरे या मुख्य बैठकीत उपस्थित नव्हत्या असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

उशीरा का होईना अक्कल आली

मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू हवी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेत जोरदार आंदोलन केले होते. आता रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला आहे. याबाबत बोलताना देशपांडे यांनी सरकारला उशीरा का होईना अक्कल आली त्यांना शुभेच्छा, असा टोलाही देशपांडे यांनी लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details