मुंबई - निसर्ग चक्रीवादळाची फटका राज्यातील कोकण विभागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. घरावरील पत्रे उडणे, रस्त्यावर झाडे पडणे यासह इतरही नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांच्या (एनडीआरएफ) संख्येत वाढ करण्यात आली असून, रायगड येथे मदतीसाठी काही पथके रवाना केले आहेत. राज्यामध्ये 20 पथके कार्यरत असून, त्यापैकी 7 पथके रायगड आणि मुंबई येथे तैनात कार्यरत असल्याची माहिती एनडीआरएफचे निर्देशक सत्यप्रधान यांनी सांगितले.
मुंबईसह राज्यामध्ये एनडीआरएफची 20 पथके कार्यरत - निसर्ग चक्रीवादळ
राज्यामध्ये 20 पथके कार्यरत असून, त्यापैकी 7 पथके रायगड आणि मुंबई येथे असल्याची माहिती एनडीआरएफचे निर्देशक सत्यप्रधान यांनी सांगितले.
राज्यामध्ये एनडीआरएफचे 20 पथके; मुंबईसह रायगडमध्ये 7 पथके कार्यरत
निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल परिसरात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हाहाकार उडाला. यामध्ये इमारतीवरील पत्रे उडाली, वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. तसेच जुना मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बंद पडला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पनवेल परिसरातील कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात वादळीवाऱ्यामुळे महाकाय वृक्ष पोलीस ठाण्याच्या इमारतीवर कोसळून मोठे नुकसान झाले.