महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदल्यांचा घोळ : राज्य पोलीस खात्यातील 20 पोलीस अधिकारी मॅटकडे - महाराष्ट्र प्रशासकीय लवादा बातमी

आतापर्यंत राज्यात 107 उपअधीक्षक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा प्रलंबित राहिल्या आहेत. त्यामुळे पोलीस खात्यात नाराजी पसरली असून याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये दाद मागितली आहे.

राज्य पोलीस खात्यातील 20 पोलीस अधिकारी मॅटकडे
राज्य पोलीस खात्यातील 20 पोलीस अधिकारी मॅटकडे

By

Published : Oct 5, 2020, 4:30 PM IST

मुंबई -महाराष्ट्र पोलीस खात्यात गेल्या काही महिन्यांपासून लटकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे राज्य पोलीस खात्यात कमालीचे नाराजी पसरली असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच काय तर महाराष्ट्र पोलीस खात्यातील 20 हुन अधिक डीवायएसपी पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये दाद मागितली आहे.

राज्य पोलीस खात्यातील 20 पोलीस अधिकारी मॅटकडे

कोरोना संक्रमण पाहता राज्यातील पोलिसांच्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ज्या सुरुवातीला 31 सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार नव्हत्या. मात्र, यात आणखीन वाढ करत 15 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यात येणार नाही, असे परिपत्रक राज्य पोलीस खात्याकडून काढण्यात आले होते.

गेल्या काही दिवसात राज्य पोलीस खात्यातील 15 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. तर, अप्पर पोलीस अधीक्षक पदावरच्या बदल्या या त्यानंतर करण्यात आलेल्या होत्या. आतापर्यंत राज्यात 107 उपअधीक्षक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा प्रलंबित राहिल्या आहेत.

राज्य पोलीस खात्यात असे बरेच अधिकारी आहे ज्यांची नक्षलग्रस्त भागात नेमणूक करण्यात आलेली असून काही जणांना साईद ब्रांचला पाठवण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून बरेच महिने झाले असले तरीही बदली न झाल्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरल्याचे चित्र दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details