मुंबई -बाई जेरबाई वाडीया रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे. लवकरच हा निधी वाडिया रुग्णालयाला उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून २४ कोटींचा निधी मंजूर
वाडिया रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती.
मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. बैठकीत वाडिया रुग्णालयाला आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आरोग्यमंत्र्यानी विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला बुधवारी वित्त विभागाने मान्यता दिली.
हेही वाचा - आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधींची घेतली भेट
मागील 90 वर्षांपासून पालिकेच्या जमिनीवर वाडीया रुग्णालय सुरू आहे. या रुग्णालयाला पालिकेकडून आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळत होते. गेल्या 3 ते 4 वर्षात या रुग्णालयाला अनुदान देण्याचे राज्य सरकारने बंद केले होते.