महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात आणखी 28 पोलिसांना कोरोनाची लागण; पोलिसांच्या मृत्यूची संख्या 45 वर - Mumbai corona news

राज्यात गेल्या 24 तासात 28 कोरोनाबाधित पोलीस आढळून आले आहेत. कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दलातील मृतांचा आकडा 45 वर गेला आहे.

maharashtra police corona update
महाराष्ट्र पोलीस कोरोना अपडेट

By

Published : Jun 19, 2020, 2:29 PM IST

मुंबई-कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी लॉकडाऊनचा 5 वा टप्पा लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यामध्ये पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.मात्र, राज्यातील पोलीसही मोठया प्रमाणावर कोरोनाबाधित झाले आहेत. पोलीस दलात गेल्या 24 तासात 28 कोरोनाबाधित पोलीस आढळून आले आहेत. कोरोनामुळे आणखी एका पोलिसाचा मृत्यू झाल्याने पोलीस दलातील मृतांचा आकडा 45 वर गेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयात अजूनही 1049 कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू असून यात 123 पोलीस अधिकारी तर 926 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लॉकडाऊन काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 32 हजार 166 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मुंबई वगळता राज्यात क्वारंटाइनचा नियम मोडणाऱ्या 734 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात या काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 270 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 854 जणांना अटक करण्यात आलेली आहे.

कोविड 19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 3 हजार 729 कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले आहेत. अवैध वाहतुकीच्या 1335 प्रकरणात 27202 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 83161 वाहन जप्त करण्यात आली असून तब्बल 8 कोटी 4 लाख 39 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 51 घटना घडल्या असून 86 पोलीस हे जखमी झाले आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ९० हजार ६४७ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ६ लाख १० हजार व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील २९ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३०, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण१ ,पालघर १ अशा ४५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details