मुंबई - कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1 हजार 201 रुग्ण आढळून आले असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 85 हजार 326 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 4 हजार 935 वर पोहोचला आहे. तर, मुंबईमधून आज एकाच दिवशी 1 हजार 269 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे, डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 57 हजार 152 वर पोहोचला आहे. तर, मुंबईत सध्या 23 हजार 239 सक्रिय रुग्ण असून मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 67 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नव्याने 1 हजार 201 रुग्ण आढळून आले आहेत. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. या 39 मृत्यूंपैकी 32 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. तर, मृतांमध्ये 23 पुरुष आणि 16 महिला रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये 2 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 22 जणांचे वय 60 वर्षावर तर 15 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते. मुंबईमधून आज 1 हजार 269 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 57 हजार 152 वर पोहोचला आहे. तर, मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 85 हजार 326 वर पोहोचली आहे. त्यापैकी 4 हजार 935 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबईमधून आतापर्यंत 57 हजार 152 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 23 हजार 239 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.