मुंबई : राज्यात आज(शुक्रवारी) ५ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७ हजार ८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२६ मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-९, ठाणे मनपा-८, नवी मुंबई मनपा-१२, कल्याण-डोंबिवली मनपा-१०, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी-निजापूर मनपा-८, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-६, नाशिक-१, नाशिक मनपा-४, धुळे मनपा-४, जळगाव-४, जळगाव मनपा-३, नंदूरबार-२, पुणे-५, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-२, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, सांगली-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-१, हिंगोली-१, परभणी-१, लातूर-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-३, वाशिम-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे. आजरोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील इतर कारणांमुळे झालेले २७५ मृत्यू कळविले आहेत.
*राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील*
*मुंबई:* बाधित रुग्ण - (९०,४६१), बरे झालेले रुग्ण - (६१,९३४), मृत्यू - (५२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (२८७), ॲक्टिव्ह रुग्ण - (२३,०३५)
*ठाणे:* बाधित रुग्ण - (५७,१३८), बरे झालेले रुग्ण - (२४,६२४), मृत्यू - (१५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (३०,९७७)
*पालघर:* बाधित रुग्ण - (८९६३), बरे झालेले रुग्ण - (४५५४), मृत्यू - (१७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (४२३८)
*रायगड:* बाधित रुग्ण - (७६१३), बरे झालेले रुग्ण - (३५०७), मृत्यू - (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (२), ॲक्टिव्ह रुग्ण - (३९५३)
*रत्नागिरी:* बाधित रुग्ण - (८३२), बरे झालेले रुग्ण - (५४३), मृत्यू - (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२६०)
*सिंधुदुर्ग:* बाधित रुग्ण - (२५४), बरे झालेले रुग्ण - (२०३), मृत्यू - (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू -(०), ॲक्टिव्ह रुग्ण - (४६)
*पुणे:* बाधित रुग्ण - (३५,२३२), बरे झालेले रुग्ण - (१५,५२६), मृत्यू - (१०२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१८,६८०)
*सातारा:* बाधित रुग्ण - (१५८५), बरे झालेले रुग्ण - (९०९), मृत्यू - (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (६११)
*सांगली:* बाधित रुग्ण - (५५०), बरे झालेले रुग्ण - (३०२), मृत्यू - (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू -(०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२३४)
*कोल्हापूर:* बाधित रुग्ण - (१०६२), बरे झालेले रुग्ण - (७६५), मृत्यू - (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२८०)
*सोलापूर:* बाधित रुग्ण - (३५९५), बरे झालेले रुग्ण - (१९८६), मृत्यू - (३३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (१), ॲक्टिव्ह रुग्ण - (१२७४)
*नाशिक:* बाधित रुग्ण - (६५८५), बरे झालेले रुग्ण - (३६३३), मृत्यू - (२६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२६८३)
*अहमदनगर:* बाधित रुग्ण - (७०३), बरे झालेले रुग्ण - (४७१), मृत्यू - (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (२१२)
*जळगाव:* बाधित रुग्ण - (५२६०), बरे झालेले रुग्ण - (३१४७), मृत्यू - (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (१७८७)
*नंदूरबार:* बाधित रुग्ण - (२४०), बरे झालेले रुग्ण - (१४९), मृत्यू - (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (८०)
*धुळे:* बाधित रुग्ण - (१४२३), बरे झालेले रुग्ण - (८३४), मृत्यू - (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू -(२), ॲक्टिव्ह रुग्ण - (५१४)
*औरंगाबाद:* बाधित रुग्ण - (७६९१), बरे झालेले रुग्ण - (३५६२), मृत्यू - (३२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू - (०), ॲक्टिव्ह रुग्ण - (३८०६)