महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Metro Work Only 1 Percent Left : टनेल बोअरिंग मशीनची कमाल मेट्रो लाईन 3 भुयारीकरणाचे काम आता फक्त 1 टक्का बाकी -अश्विनी भिडे - Ashwini Bhide

बहुचर्चेत शिंदे फडणवीस शासनाचा महत्त्वाचा (Tunnel Boring Machine Maximum Metro) प्रकल्प मुंबई मेट्रो रेल्वे लाईन तीन (Line 3 Tunneling Work Now Only 1 Percent Left) गतिमान होत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात या भुयारी मेट्रो मार्गिकेदरम्यान भुयाराचे काम ९९ टक्के पूर्ण केले आहे. आता देखभालीसाठी खाजगी कंपनीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. Ashwini Bhide

Metro Work Only 1 Percent Left
मेट्रो लाईन 3 भुयारीकरणाचे काम

By

Published : Nov 1, 2022, 5:22 PM IST

मुंबई :बहुचर्चेत शिंदे फडणवीस शासनाचा महत्त्वाचा (Tunnel Boring Machine Maximum Metro) प्रकल्प मुंबई मेट्रो रेल्वे लाईन तीन (Line 3 Tunneling Work Now Only 1 Percent Left) गतिमान होत आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात या भुयारी मेट्रो मार्गिकेदरम्यान भुयाराचे काम ९९ टक्के पूर्ण केले आहे. आता देखभालीसाठी खाजगी कंपनीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. Ashwini Bhide


बोअरिंग काम जवळपास पूर्ण :मुंबई कुलाबा-बांद्रा सिपझ या तिस-या संपूर्ण भुयारी मेट्रो मार्गिकेदरम्यान भुयाराचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून, काही ठिकाणी टनेल बोअरिंग मशीन अर्थात टीबीएम मशिन्स बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे देखभालीसाठी खाजगी कंपनीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा जारी केल्या असून, २० डिसेंबरपर्यंत उत्सुक कंपन्यांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मेट्रो रेल्वे महामंडळाने केले आहे.



सोबतच निविदा जारी : 'मेट्रो लाईन ३ च्या भुयारीकरणाचे ९९ टक्के काम पूर्ण झालं. आता केवळ 1 टक्का काम बाकी असल्याची माहिती एमएमआरसीएल अधिकाऱ्यांनी दिली असून, संपूर्ण प्रकल्पाचे काम ७५.६५ टक्के पूर्ण झाले आहे. ४३ टक्के ट्रकचे काम तर कारशेड डेपोचे २९ टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत चाचणीसह मेट्रो ३ सेवेत दाखल करण्यासाठी एमएमआरसीएलची लगबग सुरू आहे.

डिसेंबर २०२३ पर्यंत मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील :मेट्रो मार्गिका संपूर्णतः भुयारी असल्यानेच देखभाल तसेच सुरक्षेच्या दृष्टीने खाजगी कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय एमएमआरसीएलने घेतला आहे. सर्व मेट्रो भुयारी स्थानकावर सरकत्या पायऱ्या बसवण्याचे काम सुरू असून; प्लॅटफार्म स्क्रिन डोअर्स, उदवाहन, तसेच इतर बाबींचे काम गतिने सुरू आहे. आरे सारीपूत नगर येथे मेट्रो ३ चे कारशेड उभारण्यात येत असून, संपूर्ण क्षमतेने त्यांची चाचपणी केल्यानंतरच डिसेंबर २०२३ पर्यंत पहिल्या मेट्रो रेल्वेला हिरवा कंदील दाखवला जाईल,' असे महामंडळाच्या संचालिका अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details