मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येच्या ( Tunisha Sharma Suicide Case ) बातमीने इंडस्ट्रीतील लोक आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या आईने तिच्या मुलीचा सहकलाकार शीजान मोहम्मद खान विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल ( Tunisha Mother Complaint Against Sheezan Khan ) केली. ज्यावर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. तुनिषा शर्माचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दीड वाजताच्या सुमारास पाठवण्यात आला होता. पहाटे साडेचार वाजेपर्यंत तुनिषा शर्माच्या मृतदेहाचे जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात ( Tunisha Sharma Postmortem at JJ Hospital ) आले. शवविच्छेदन अहवालातून तुनिषाच्या अंगावर कोणत्याही जखमा आढळून न आल्याने तिचा गळफास घेतल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले ( Tunisha Sharma Died Due To Suffocation ) आहे.
तुनिषा शर्मा गरोदर होती? :तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर पोलिसांनी कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केलेले नाही. मात्र, अभिनेत्री गरोदर असल्याचे पोलिसांनी स्पष्टपणे नाकारले आहे. अद्याप तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. साधारणपणे फास लावल्यानंतर गुदमरल्याने मृत्यू होतो. अशा स्थितीत ते आता तुनीषाने गळ्यात बांधलेला दुपट्टा की दोर होता, तो शोधत आहेत. तथापि, आतापर्यंत या प्रकरणात गर्भधारणेशी संबंधित काहीही पुरावे मिळालेले नाहीत. शीझान खानला न्यायालयात हजर करण्यात आले