मुंबई :तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषद (Tunisha Sharma Mother Press conference ) घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी शिझानवर गंभीर आरोप केले ( Tunisha Sharma mother allegation on Sheezan Khans ) आहेत. त्याने ब्रेकअपच्या वेळी तिला मारहाण केली. असभ्य भाषेचा वापर केला. रिलेशनशीपमध्ये असताना तिचा फायदा घेतला. असे गंभीर आरोप तुनिषा शर्माच्या आईने पत्रकार परिषदेतून केले आहेत.
तुनिषाचा फायदा घेतला : मालिकेच्या सेटवर आधी तिच्याशी जवळीक वाढवली. तिचा विश्वास कमावला. शिझानने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. महागड्या भेटवस्तू तुनिषाने ( Sheezan Khan Took Tunisha Sharma Advantage ) दिल्या. मला आवडत नसलेल्या गोष्टी केल्या, जसे की टॅटू काढणे, घरात कुत्रा पाळणे तरीही त्यांनी ते केलं. कारण शिझान आणि त्याच्या कुटूंबाने तुनिषाला हिप्नोटाईज केल्या सारखं केल होतं. ती माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होती. त्यांच्या गोष्टींना प्राधान्य देत होती. सगळ मिळाल्यावर तिच्याशी ब्रेकअप केले. ब्रेकअपच्या वेळी तिला कानाखाली मारली होती. तेव्हा ती खूप रडली. तिला खूप त्रास झाला. शिझानचे आधीच दुसऱ्या मुलीसोबत रिलेशन होते. असे असतानाही त्याने तुनिषासोबत नाते का बनवले. माझी गाडी तो वापरायचा. त्याने वापर केलेल्या गाड्यांचे आणि ड्रायव्हरचे 50 हजारांचे मी बील भरले आहे.