मुंबई- मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव शुक्रवारपासून पूर्णपणे भरून वाहू लागला आहे. त्यामुळे सध्या लागू असलेली पाणी कपात लवकरच रद्द केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईला भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, विहार, मोडक सागर, तुळशी या तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. भातसा तलावातून सर्वाधिक पाणी पुरवठा होतो. तर तुळशी आणि विहार या 2 तलावांमधून सर्वात कमी पाण्याचा पुरवठा होतो. यंदाचा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने तलावात पाणीसाठा वाढतो आहे.