मुंबई :बाळासाहेब ठाकरे यांच्यातील चित्राचे अनावरण विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात केले जाणार आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने यातील चित्राचे आणावरण केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमातून राज्य सरकार विरुद्ध ठाकरे कुटुंबीय, असा वाद पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.
तैलचित्राच्या अनावरणाला ठाकरे कुटुंबीयांना निमंत्रण नाहीतैलचित्राच्या आनावरणाच्या कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबीयांना निमंत्रणच देण्यात आलेले नाही. या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या आमंत्रणपत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नावही टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे पहिली चित्राच्या अनावरणाच्या या कार्यक्रमापासून ठाकरे कुटुंबीयांना दूर ठेवण्याचे काम राज्य सरकार करते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आधीपासूनच सुरू झाली आहे. तर या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमावरून ठाकरे गटाने या आधीपासूनच नाराजी व्यक्त केली आहे.
बाळासाहेबांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न :23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने विधानसभेच्या मुख्य सभागृहात होणाऱ्या अनावरणाच्या कार्यक्रमातून बाळासाहेब ठाकरे यांची जनसामान्यात असलेली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जनसामान्यात एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणून सगळेच जण पाहतात. यासोबतच शिवसेना प्रमुख म्हणूनदेखील त्यांची ओळख आहे.
तैलचित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांची वेगळी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न : खासदार विनायक राऊत यांची टीका बाळासाहेबांची वेगळी प्रतिमा तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न :तैलचित्रातमध्ये याबाबतचा कोणताही असा उल्लेख नाही. जनसामान्यात बाळासाहेबांची वेगळी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. त्यामुळेच या चित्राचे अनावरण केले जात आहे. या चित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांचे वेगळे चित्र तयार करण्याचा जो प्रयत्न केला जातोय. ते योग्य नाही, असा इशारा विनायक राऊत यांनी राज्य सरकारला दिला आहे.
उद्धव ठाकरे असतानाही तरी चित्राचे अनावरण का केले नाही :एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर पक्ष चालवत आहोत. सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानसभेत लावता आलेले नाही. तैलचित्र लावण्यापासून उद्धव ठाकरे यांना कोणी थांबवलं होते? असा सवाल शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेबांची जनमानसातील प्रतिमा कोणालाही पुसता येणार नाही. ते हिंदुहृदय सम्राट होते आणि तसा उल्लेख तैलचित्रातदेखील करण्यात आलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून घेतला जाणारा आक्षेपाला कोणताही आधार नाही असेही ई-टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.