महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Truck Bus Accident  : शिर्डीजवळ ट्रक व बसचा भीषण अपघात, दहा साईभक्तांचा मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक महामार्गावरील पाथरे जवळील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ दिनांक 13 जानेवारी शुक्रवारी खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Truck Bus Accident in Shirdi
शिर्डी अपघात

By

Published : Jan 13, 2023, 9:17 AM IST

Updated : Jan 13, 2023, 10:38 AM IST

शिर्डीजवळ ट्रक व बसचा भीषण अपघात, दहा साईभक्तांचा मृत्यू

शिर्डी : दरम्यान मुंबई येथून शिर्डीकडे येणाऱ्या खाजगी आराम बस क्रमांक एम एच 04 एसके 2751 व शिर्डीबाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच 48 टी 1295 यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाक्यादरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. प्रवाशांना शिर्डी येथील सुपर हॉस्पिटल आणि नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याची प्राथमिक माहिती आहे. वावी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत : नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

6 जणांचा बळी : अलीकडच्या काळात राज्यासह देशभरातील अपघातांमध्ये वाढ होत आहे. उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात धुक्याच्या कहराने 6 जणांचा बळी घेतला. राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या दुकानात एका डंपरने 10 जणांना धडक दिली. या अपघातात लोकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर रुग्णालयात नेत असताना एकाचा मृत्यू झाला. त्याचवेळी शेजारून वाहणाऱ्या कालव्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आमदार बच्चू कडूंचा नुकतेच झाला आहे अपघात : नुकतेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाहनाचा कठोरा नाका परिसरात अपघात झाला आहे. त्यांचे वाहन रस्ता दुभाजकावर आढळून उलटले. हा अपघात आज सकाळी सव्वा सहाच्या सुमारास झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कारण समोर येत आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कार ट्रकच्या अपघातात पालघर जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू :नुकतेच जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशन परिसरात कार, ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पालघर जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण अपघातात नवजात बालकासह तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात चार जण जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या पोलिसांनी जखमींचे जबाब नोंदवलेले नाहीत. या घटनेबाबत अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एका ट्रकने मागून कारला धडक दिली.

मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार :नुकतेच मुंबई आग्रा महामार्गावर मंगळवारी रात्री भरधाव आयशरने धडक दिल्याने तिघे युवक ठार झाले. या घटनेला 10 तास बुधवारी सकाळी नाशिक शहर गुन्हेशाखेच्या पाेलिस वाहनाला अपघात झाला. त्यात तीन अंमलदार जखमी झाले. मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी येथील पंढरपूरवाडी भागात भरधाव आयशरने बैलगाडी आणि मोटारसायकला धडक दिल्याने अपघात झाला.इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्ती इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालय ( Igatpuri Rural Hospital ) येथे दाखल करण्यात आले आहे. भरधाव आयशरचा चालक पसार झाला आहे. अपघातात प्रभाकर सुधाकर आडाेळे(२५), कुशल सुधाकर आडाेळे(२२), रोहित भगीरथ आडोळे (१९) अशी मृत युवकांची नावे आहेत.

हेही वाचा :Accident News पालघरजवळ कारट्रकचा भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू तर चार गंभीर

Last Updated : Jan 13, 2023, 10:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details