महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवईत मेट्रोच्या कामात ट्रक घुसला, विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली - mumbai metro work

विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर मध्यरात्री एक डंपर मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भरधाव वेगात घुसला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली.

पवईत मेट्रोच्या कामात ट्रक घुसला

By

Published : Oct 23, 2019, 10:02 AM IST

मुंबई -विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर मध्यरात्री एक डंपर मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भरधाव वेगात घुसला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली आहे.

पवईत मेट्रोच्या कामात ट्रक घुसला, विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक मंदावली
या घटनेमुळे गांधीनगर जंक्शन ते पवई पोलीस स्टेशनपर्यंत पहाटेपासूनच वाहनांची मोठी रांग लागली आहे. अपघातस्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्याचे कार्य चालू आहे. या अपघाताने सकाळी कामावर जाणाऱ्या गोरेगाव, बोरिवली, अंधेरी, साकीनाका, एल अँड टीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना व वाहनचालकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details