मुंबई - पूर्वद्रुतगती मार्गावरून पालिकेचा कचरा वाहतूक करणारा ट्रक मुलुंड डम्पिंग ग्राउंडकडे वेगात जात असताना, या ट्रकाचा बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान उपघात झाला आहे. या उपघातात ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
भांडुपात पालिकेच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू - bhandup news
भांडूपात कचरा वाहून नेणाऱ्या ट्रक चालकाने मद्यपान करुन एका दुचाकीला धडक दिली आहे.
भांडुपातील उपघात
पोलिसांनी कचरा वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला असून चालकाला अटक अटक केली आहे. यावेळी चालक शहाबुद्दीन कमरुद्दीनखान (वय, 45) याने मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त ईश्वर तायडे यांनी दिली. दरम्यान, विक्रोळी पोलीस पुढील तपास करीत आहेत.