मुंबई - सांगली जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. शासनाने स्थितीचा आढावा घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्री-सदस्यीय समिती नेमली आहे. सापळे यांच्यासह ही समिती सांगलीत राहूनच स्थितीचा आढावा घेणार असल्याचे माहिती मिळत आहे.
जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे यांच्यासह त्री-सदस्यीय समिती सांगलीत राहूनच स्थितीचा आढावा घेणार - world health emergency
सांगलीतील इस्लामपुरात काल एकाच दिवशी 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. शासनाने स्थितीचा आढावा घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली त्रि-सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती सांगलीत राहूनच स्थितीचा आढावा घेईल.
दरम्यान, सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी या स्थितीची आढावा घेतला आहे. ज्या इस्लामपूर भागात हे 12 रुग्ण आढळले आहेत, तो भाग पूर्णतः सील करण्यात आला आहे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचेही विलगीकरण केल्याची माहिती पाटील यांनी दिली.
सांगलीतल्या इस्लामपूर भागात आखाती देशातून भारतात परतलेल्या नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. सुरुवातीला पाच रुग्ण आढळले. मात्र शुक्रवारी विलगीकरण करण्यात आलेल्या 25 जणांपैकी 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिथल्या परिसरात घबराट उडाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी. तसेच, संचारबंदीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.