मुंबई- रक्षाबंधन एक दिवसावर येऊन ठेपल्याने बाजारपेठा विविध वस्तूंनी आणि राख्यांनी सजल्या आहेत. यावेळी टिकाऊ राख्यांना मोठी मागणी आहे. भायखळा येथील एक विक्रेते शेख समशूल हक अब्दुल रझाक यांनी अनोखी राखी विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. 'वायर राखी' म्हणून ती प्रसिद्ध आहे. अल्युमिनियमच्या तारेपासून बनवलेली व त्यावर नावाचे पहिले आद्याक्षर अशी रचना असलेल्या राख्या ते विकत आहेत.
राखी पौणिमेनिमित्त टिकाऊ 'वायर' राख्यांचा ट्रेंड, मुंबईत एकमेव विक्रेत्याकडे मागणीचा ओघ
भायखळा येथील एक विक्रेते शेख समशूल हक अब्दुल रझाक यांनी अनोखी राखी विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. 'वायर राखी' म्हणून ती प्रसिद्ध आहे.
अशा प्रकारच्या राख्या रझाक यांच्याकडेच उपलब्ध असल्याने मुंबईत त्यांच्या राख्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राखीवर भावाचे नाव लिहून घेण्याचा ट्रेंड हा वाढत आहे. अख्तर यांनी हा ट्रेंड वायर राखीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला आहे. नावाचे पहिले आद्याक्षर ते रखीवर बनवत आहेत. यावर्षी अब्दुल रझाक यांच्या वायर राख्यांना देशभरातून तसेच परदेशातूनही मोठी मागणी मिळत आहे. अल्युमिनियमच्या तारेपासून राख्या तयार केल्या गेल्या आहेत.
अब्दुल रझाक यांनी सांगितले की, आम्ही गेल्या 15 वर्षापासून अल्युमिनियमच्या तारेपासून अनेक वस्तू तयार करतो. ग्राहकाला हवे असेल तसे डिझाईन मी बनवून देतो. मागच्या वर्षी मी विचार केला की यापासून राख्या तयार करता येऊ शकतात. मग ज्या बहिणीला तिच्या भावाला राखी द्यायची आहे. त्या भावाच्या नावाचे पहिले आद्याक्षर असलेली राखी बनवून देऊ लागलो. या नावाच्या राख्याना मोठी मागणी मिळत आहे. तसेच ऑनलाईनही मागणी आहे. वायरच्या माध्यमातून वस्तू तयार करणारा मी मुंबईला एकटाच आहे. या आर्टला मला पुढे आणायचे आहे, असेही रझाक यांनी सांगितले.