महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : तौक्ते वादळाचा फटका; मुंबईत दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर झाडे पडून - trees fell on streets mumbai

मुंबईत तौक्ते चक्री वादळादरम्यान सांताक्रुझ येथे २३०.०३ मिलीमीटर तर कुलाबा येथे २०७.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर वादळादरम्यान ११४ किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. वादळासह पावसाने रुद्रावतार धारण केल्याने मुंबईला त्याचा फटका बसला.

Trees fell on the streets in Mumbai on second day after tauktae cyclone
मुंबईत दुसऱ्या दिवशीही रस्त्यावर झाडे पडून

By

Published : May 19, 2021, 5:02 PM IST

मुंबई -जोरदार तडाखा देणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव ओसरला आहे. यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या वादळादरम्यान प्रचंड वेगाने वारे वाहिल्याने मुंबईतील तब्बल २,३६४ झाडे कोसळली. यापैकी मुख्य रस्त्यावरील झाड़े बाजूला हटवून रस्ते वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वादळानंतर आज (बुधवारी) दुसऱ्या दिवशीही शेकडो झाडे रस्त्यावर पडून आहेत. ही झाडे अद्यापही हटवण्यात आलेली नसल्याने नागरिकांना आणि वाहनांना ये-जा करताना अडचणी येत आहेत.

मुंबईहुन ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा

वादळाचा तडाखा -

मुंबईत तौक्ते चक्री वादळादरम्यान सांताक्रुझ येथे २३०.०३ मिलीमीटर तर कुलाबा येथे २०७.६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर वादळादरम्यान ११४ किलोमीटर वेगाने वारे वाहिल्याची नोंद झाली आहे. वादळासह पावसाने रुद्रावतार धारण केल्याने मुंबईला त्याचा फटका बसला. जागतिक वारसा असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला असलेली सुरक्षा भिंत कोसळली. अनेक वाहने, घरांवर झाडे पडल्याने मालमत्तेचे नुकसान झाले.

हेही वाचा -मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्यांना वाचविण्याचा थरारक व्हिडिओ

दोन हजारांहून अधिक झाडे कोसळली; महिलेचा मृत्यू -

चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी सकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत २४ तासांत एकूण २३६४ झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्या. यात शहरात ६६६, पूर्व उपनगरांत ५९५ तर पश्चिम उपनगरांत ११०३ असे एकूण २३६४ झाडे पडल्याची नोंद झाली. यात वरळी बीडीडी चाळ येथे वडाचे झाड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.

मुख्य रस्तावरील झाडे उचलली -

मुंबईत वादळाच्या फटक्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडे पडण्याच्या घटना घडल्या. अशा परिस्थितीत महापालिकेकडून पडलेली झाडे हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली जाते. पालिकेने अनेक ठिकाणची पडलेली झाडे हटवली. मात्र, मुख्य रस्त्याच्या व्यतिरिक्त जी झाडे पडली आहेत ही झाडे आज दुसऱ्या दिवशीही रस्तावर पडून आहेत. महापालिका, अग्निशमन दल, गार्डन विभाग यांच्याकडून झाडे हटवण्यात आली नसल्याने नागरिकांना आणि वाहनांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. दरम्यान, याबाबत महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता झाडे उचलण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा -नौदलाचे आभार मानताना 'बार्ज'वरील कर्मचाऱ्याला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ..

ABOUT THE AUTHOR

...view details