महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दादरमध्ये झाड पडून वाहनाचे नुकसान, ३ दिवसात पडली १०० झाडे - veicals

गेल्या 3 दिवसापासून मुंबईत पावसाची संततधार सुरू असून, मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहे. या वाऱ्यामुळे मुंबईमध्ये झाड पडण्याच्या घटना देखील वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. ३ दिवसात झालेल्या पावसात 100 पेक्षा जास्त झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाऱ्यामुळे आज (रविवार) दुपारी दोनच्या सुमारास शिवसेना भवनासमोरील एल. जे. रोड येथे झाड पडल्याची घटना घडली.

दादरमध्ये झाड पडून वाहनाचे नुकसान

By

Published : Jun 30, 2019, 8:02 PM IST

मुंबई - गेल्या 3 दिवसापासून मुंबईत पावसाची संततधार सुरू असून, मोठ्या प्रमाणात वारे वाहत आहे. या वाऱ्यामुळे मुंबईमध्ये झाड पडण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. ३ दिवसात झालेल्या पावसात 100 पेक्षा जास्त झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वाऱ्यामुळे आज (रविवार) दुपारी दोनच्या सुमारास शिवसेना भवनासमोरील एल. जे. रोड येथे झाड पडल्याची घटना घडली. यामध्ये एका गाडीचे नुकसान झाले आहे.

दादरमध्ये झाड पडून वाहनाचे नुकसान

मुंबईत धोकादायक झाडे पडण्याचे प्रमाण वाढत आहे. ३ दिवसात झालेल्या पावसात 100 पेक्षा जास्त झाडे पडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दादर येथे आज एक झाड पडून वाहनाचे मोठे नुकसान झाले यावेळी गाडीत कोणी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. मात्र पुन्हा एकदा धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबईत मान्सूनला सुरुवात होण्याआधीच 3 बळी गेले आहेत. मालाडमध्ये नारियलवाला कॉलनीजवळ एसव्ही रोडवर अंगावर झाडाची फांदी कोसळून शैलेश राठोड यांचा मृत्यू झाला. तर अंधेरी महाकाली केव रोडवर तक्षशीला सोसायटी परिसरात झाड पडून 48 वर्षीय अनिल नामदेव घोसाळकर जखमी झाले होते. मात्र, होली स्पिरीट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोवंडीमध्ये 43 वर्षीय नितीन शिरवळकर यांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details