मुंबई - शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयाने आरेतील कारशेड प्रकरणी सर्व याचिका निकालात काढल्या. त्याला एक दिवसही होत नाही तोच काल (शुक्रवारी) रात्री आरे कॉलनीतील मेट्रो रेल प्रोजेक्ट परिसरातील झाडे रातोरात तोडण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि काही पर्यावरण प्रेमींनी या परिसरात जोरदार निदर्शने केली. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरेतील वृक्षतोड तत्काळ थाबंवण्यात यावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. आरेमधील आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून हटवण्यात आले आहे. दरम्यान, आज (शनिवार) सकाळी पोलिसांनी या परिसरात १४४ कलम लावून जमावबंदी केली आहे.
LIVE UPDATE -
- 02: 37PM - मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनाही पोलिसांनी रोखले.
- 11:45 AM - शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
- 11:30 AM - पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोडण्याची भीम आर्मीची मागणी
- 11:20 AM - दहिसर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा भीम आर्मीचा इशारा
- 11:10 AM - अभिनेत्री रेशम टिपणीस ताब्यात
- 11:00 AM - माजी महापौर शुभा राऊळ, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे, सिनेट सदस्य शीतल देवरूखकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
- 10:30 AM - आरे परिसराजवळ कलस १४४ लागू
- 10:00 AM - आरे परिसराजवळ जमावबंदीचा आदेश लागू.
- 9:55 AM - आरेत जाणाऱ्या दूचाकीवर बंदी घालण्यात आली आहे.
- 9:45 AM - वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मरोळ व पवई येथून आरेत जाणाऱ्या रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- 9:40 AM - आरे कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत.
- 9:35 AM - ताब्यात घेतलेल्या लोकांमध्ये महिला आणि मुलींचाही समावेश आहे.
- 9:20 AM - रात्री ताब्यात घेतलेल्या लोकांना दहिसर आणि आरे पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
- 9:10 AM - रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडं कापल्याची स्थानिकांनी दिली.
- 9:00 AM - न्यायालयाच्या निर्णयनंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली.
हेही वाचा -आरे मेट्रो कारशेडच्या विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या