महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरेतील वृक्षतोडीला सुरुवात; नागरिकांची मोठ्या प्रमाणात निदर्शने - आरे वृक्षतोड

मेट्रो कारशेडमध्ये वृक्षतोडीचा विरोधात पर्यावरणवादी संस्थांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गेल्या काही महिन्यांपासून सुनावणी सुरू होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे मधील वृक्षतोडी संदर्भात दिलेला अहवाल वैध ठरवत या विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. त्यानंतर आरेतील झाडे तोडण्यास सुरुवात झाली.

आरेतील झाडं तोडण्यास सुरुवात

By

Published : Oct 4, 2019, 11:07 PM IST

Updated : Oct 5, 2019, 9:22 AM IST

मुंबई - शुक्रवारी सकाळी उच्च न्यायालयाने आरेतील कारशेड प्रकरणी सर्व याचिका निकालात काढल्या. त्याला एक दिवस उलटत नसताना आरे कॉलनीतील झाडे रातोरात तोडण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. स्थानिकांसह अनेक पर्यावरणवादी संघटनांनी या निर्णयाविरोधात आंदोलन केले आहे. आरेतील वृक्षतोड तत्काळ थाबंवण्यात यावी, या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत. आरेमधील आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून हटवण्यात आले आहे.

हेही वाचा - आरे मेट्रो कारशेडच्या विरोधातील सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरेत 2700 झाडे तोडण्यास यापूर्वीच मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. आता न्यायालयानेही याचिका निकालात काढल्याने थेट झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. याची माहिती मिळताच स्थानिक आदिवासी व सेव्ह आरेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आरेतील वृक्षतोडीला सुरुवात; स्थानिकांची घटनास्थळी धाव

हेही वाचा - पीएमसी बँकेवरील निर्बंधांचा ग्राहकांना फटका; संतप्त खातेधारकांची रिझर्व्ह बँकेबाहेर निदर्शने

मात्र याबाबत पालिका, पोलीस किंवा मुंबई मेट्रो प्राधिकरण यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

तोडलेली झाडे
Last Updated : Oct 5, 2019, 9:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details