मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्स येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका कारवर झाडाची फांदी (tree branch fell on car at Mahalakshmi Race) कोसळली. यामुळे कारमधील एकजण मृत पावल्याची घटना समोर आली (tree branch fell on car one person died) आहे. सदर व्यक्ती ठाणे येथील असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
One Person Died : झाडाची फांदी कारवर कोसळली ; एकाचा मृत्यू - झाडाची फांदी कारवर कोसळली
महालक्ष्मी रेसकोर्स येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका कारवर झाडाची फांदी (tree branch fell at Mahalakshmi Race) कोसळली. यामुळे कारमधील एकजण मृत पावल्याची घटना समोर आली (tree branch fell on car one person died) आहे.
फांदी कारवर कोसळली :मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास महालक्ष्मी, ई. मोझेस रोड, रेसकोर्स येथे काम सुरू होते. यावेळी पोकलेन मशीनचा धक्का झाडाच्या फांदीला लागला. यामुळे ही फांदी खाली उभ्या असलेल्या कारवर कोसळली. या दुर्घटनेत कारमध्ये एक जण जखमी (tree branch fell on car at Mahalakshmi Race) झाला.
रुग्णालयात आणण्यापूर्वी मृत्यू :त्याला त्वरित जवळच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात आणण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या व्यक्तीचे नाव साईयोग मनोहर पवार असून तो ३८ वर्षाचा आहे. हा व्यक्ती ठाणे येथील (one person died at Mahalakshmi Race) आहे.