मुंबई - राज्यात कोरोना थैमान सुरू आहे. या कोरोनाची बाधा अनेकांना झाली आहे. अनेक जणांनी कोरोनावर मात देखील केली आहे. तर काही जणांचा या कोरोनाने बळी घेतला आहे. या कोरोनाच्या युद्धात पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत मैदानामध्ये आहेत ते आपले पोलीस बांधव. महाराष्ट्र पोलीस दलात आजघडीला 3 हजार 725 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 414 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील 3 हजार 725 जणांना कोरोनाची लागण - corona positive Police news
महाराष्ट्र पोलीस दलात आजघडीला 3 हजार 725 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात 414 अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
कोरोना पसरू नये म्हणून पोलीस नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला देतात. प्रसंगी पोलिसांनी खाक्या देखील दाखवल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र त्या नागरिकांच्या भल्यासाठी पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली. आजपर्यंत पोलीस दलातील 37 हजार 76 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुर्दैवाने यात 427 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यात 36 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, आपले कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी आत्तापर्यंत राज्यभरातील 3 लाख 29 हजार 215 जणांवर गुन्हे देखील नोंद केली आहेत.
हेही वाचा -नेस्को कोविड केंद्रात दीड हजार नवीन बेड्स, दोनशे बेड्स सुरू
हेही वाचा -'लसीचा दुसरा डोस चुकला? काळजी नको, पण पहिल्या डोसपासून 3 महिन्यांच्या आत दुसरा डोस घ्या'