महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 10, 2020, 10:27 PM IST

Updated : Apr 10, 2020, 11:59 PM IST

ETV Bharat / state

१५ दिवसात ३७,७००हून अधिक मालगाड्यांमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

२४ तासातही दिवस मध्य रेल्वेची मालवाहतूक सेवा अविरतपणे सुरू आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणी २३ मार्च ते ७एप्रिल पर्यंत या वॅगन्स लोड केल्या गेल्या. अत्यंत वरिष्ठ स्तरावर अधिका-यांमार्फत मालवाहतूकीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

Transportation of essential goods in 15 days during lockdown
१५ दिवसात ३७,७००हून अधिक मालगाड्यांमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक

मुंबई -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक ठप्प असली तरी मध्य रेल्वे आवश्यक वस्तू वाहून नेण्यासाठी मालवाहतूक चालवत आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी मध्य रेल्वे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या १५ दिवसांत मध्य रेल्वेने ३७,७०० हून अधिक माल गाड्यांमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली आहे.

मध्य रेल्वेची ही मालवाहतूक सेवा अविरतपणे सुरू आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे अशा विविध ठिकाणी २३ मार्च ते ७ एप्रिल पर्यंत या वॅगन्स लोड केल्या गेल्या. अत्यंत वरिष्ठ स्तरावर अधिकाऱ्यांमार्फत मालवाहतूकीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

वस्तू - वॅगन्स
कोळसा - २२,४३४
कंटेनर - ११,०९९
पेट्रोलियम उत्पादने - २,४६५
विविध वस्तू - ८१५
खते - ३९२
स्टील - १६९
साखर - १६८
डी-ऑईल केक - १२६
सिमेंट - ११७
एकूण - ३७,७८५

Last Updated : Apr 10, 2020, 11:59 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details