महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक..! मध्य रेल्वेनेकडून 283 टन वैद्यकीय तर 970 टन नाशवंत खाद्यपदार्थांची वाहतूक

मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात 283 टन वैद्यकीय वस्तूंची वाहतूक केली. देशभरातील लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे प्राथमिकतेने वैद्यकीय वस्तूंची अखंड वाहतूक सुनिश्चित करत आहे.

Central Railway
दिलासादायक..! मध्य रेल्वेनेकडून 283 टन वैद्यकीय तर 970 टन नाशवंत खाद्यपदार्थांची वाहतूक

By

Published : Apr 29, 2020, 9:42 PM IST

मुंबई - कोरोनाच्या विरोधात लढाई सुरू असताना मध्य रेल्वेने लॉकडाऊन दरम्यान देशभरात 283 टन वैद्यकीय वस्तूंची वाहतूक केली. देशभरातील लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वे प्राथमिकतेने वैद्यकीय वस्तूंची अखंड वाहतूक सुनिश्चित करत आहे. वेळापत्रकानुसार 180 पार्सल गाड्या यापूर्वीच चालवण्यात आल्या आहेत आणि 40 गाड्या नियोजित आहेत.

पार्सल गाड्यांमधून मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ विभागातून 2 हजार 29 टनांहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे. त्यामध्ये लॉकडाऊन दरम्यान 283.5 टन अत्यावश्यक औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. यात फळ, भाज्या इत्यादी 970 टन नाशवंत वस्तूंचा देखील समावेश आहे.

रूग्णांना तातडीची औषधे, उंटांचे दूध पाठविण्याकरिता इतर रेल्वेबरोबर मध्य रेल्वे समन्वय साधत आहे. नुकताच सिकंदराबाद येथील एका मुलाला विशेष उपचारासाठी उंटाच्या दुधाची गरज भासली. ती फलना येथून वांद्रे टर्मिनस, सीएसएमटी मार्गे सिकंदराबाद येथे 28 तासांत पोहचविण्यात आली.

वेगवान विचारानुरूप कार्याच्या आणखी एका घटनेत पार्सल कार्यालयाने हृदयरोग्यासाठी औषधाचे पार्सल घेतले आणि मुंबईतील विक्रोळी ते चिपळूणसाठी ओखा-एर्नाकुलम या पार्सल ट्रेनमध्ये बुक केले. चिपळूण येथे गाडी थांबत नसली तरी कर्मचार्‍यांनी कोकण रेल्वेशी समन्वय साधून पार्सल देण्यासाठी थांबा द्यावा अशी विनंती केली, यानंतर हे औषधाचे पार्सल चिपळूण येथे स्टेशन मास्टर यांच्याकडे देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details