महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Transfers of IAS officers after winter session : हिवाळी अधिवेशनानंतर खांदेपालट; तुकाराम मुंडेंच्या जागी धीरज कुमार यांची वर्णी

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ( Winter Session of State Legislature ) पार पडताच शिंदे सरकारने (Shinde Government) चार अधिकाऱ्यांची खांदेपालट केली. रायगडचे जिल्हाधिकारी असलेल्या डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हाती कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त पदाची ( Divisional Commissioner post ) धुरा सोपवली आहे. तर आरोग्य विभागाच्या आयुक्तपदी धीरज कुमारांची वर्णी लावली आहे. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सरकारने बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे नजीकच्या आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. डॉ. कल्याणकर यांच्या बदलीनंतर आता रायगड जिल्हाधिकारी पदी कुणाची वर्णी लागणार याची अधिकारी वर्तुळात उत्सुकता आहे. ( Transfers of IAS officers after winter session )

Transfers of officers after winter session
हिवाळी अधिवेशनानंतर खांदेपालट

By

Published : Jan 3, 2023, 8:48 AM IST

मुंबई :राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर अधिकार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. ( Winter Session of State Legislature ) आज चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ( Shinde Government ) सार्वजनिक आरोग्य विभागात सहसचिव असलेले डी.बी.गावडे यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी बदली केली आहे. तर, रायगडच्या जिल्हाधिकारीपदी असलेले डॉ.महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त पदी (Divisional Commissioner post ) बदली करण्यात आली आहे. तसेच, तुकाराम मुंडे यांच्याकडे असलेले आरोग्य सेवा आणि कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तपदी आता धीरज कुमार यांची बदली करण्यात आली आहे. डी.बी गावडे आणि डॉ. महेंद्र कल्याणकर हे 2007 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तर, धीरज कुमार हे बॅच 2005चे आयएएस अधिकारी आहेत. ( Transfers of IAS officers after winter session )

रायगड जिल्हाधिकारी पदी कुणाची वर्णी :शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या आतापर्यंत बदल्या करण्यात आल्या आहेत. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सरकारने बदल्यांचे सत्र सुरू केले आहे. नजीकच्या काळात आणखी काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. डॉ. कल्याणकर यांच्या बदलीनंतर आता रायगड जिल्हाधिकारी पदी कुणाची वर्णी लागणार याची अधिकारी वर्तुळात उत्सुकता आहे.


यापूर्वी झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या :5 ऑगस्ट रोजी 3 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, डॉ. विजय सूर्यवंशी, सुशील खोडवेकर यांचा समावेश होता. त्यानंतर, 29 सप्टेंबर रोजी पुन्हा आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशा तब्बल 44 वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या घाउक बदल्या केल्या होत्या. 3 नोव्हेंबरमध्येही चार आयएएसच्या बदल्या केल्या होत्या. आशिष कुमार सिंग, आभा शुक्ला, दिनेश टी.वाघमारे, पराग जैन नैनुतिया आदी सनदी अधिकाऱ्यांच्या यात समावेश होता. शुक्रवारी 6 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या होत्या. आता पुन्हा तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

अधिकारी तुकाराम मुंढे कायम चर्चेत :आरोग्य विभागातील सेवा आयुक्तालयात सनदी अधिकारी तुकाराम मुंढे ( Officer Tukaram Mundhe Transfer ) यांची आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. आरोग्य विभागाला कडक शिस्तीचे धडे देत असतानाच, अवघ्या दोन महिन्यांत मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यांची बदली केली असली, तरी त्यांना अद्याप प्रतिनियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे काही काळ प्रतीक्षेत राहावे लागणार आहे. सततच्या बदलीमुळे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे कायम चर्चेत असतात. आताही दोनच महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाच्या सेवा संचालनालयाच्या आयुक्तपदावर नियुक्ती केली होती. विभागाचा पदभार स्वीकारताच त्यांनी नेहमीच्या धडाक्यात काम सुरू केले.

ABOUT THE AUTHOR

...view details