महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Officers Transfer In State : राज्यात 32 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; संभाजीनगरचे विवादित 'सीपी' डॉ. निखिल गुप्तांची हकालपट्टी - 32 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने सोमवारी 32 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. गेल्या एक महिन्यापासून विवादाच्या चर्चेत असलेले छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Police Officers Transfer In State
पोलीस अधिकारी बदली

By

Published : Apr 25, 2023, 5:26 PM IST

मुंबई:मनोजलोहिया हे मराठवाड्यातील जालना शहरातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत काम केले आहे. सोमवारी सायंकाळी राज्य सरकारने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. संभाजीनगरमध्ये गेल्या महिन्यात रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरात झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यावर अनेक आरोप केले जात होते.


दानवेंच्या आरोपामुळे पोलीस दलात खळबळ: विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन संभाजीनगर शहरातील अवैध धंद्यावर प्रकाश टाकला.स्थानिक शहर पोलीस दलाकडून अवैध धंदे करणाऱ्यांकडून दरमहा ६० ते ८० लाख रुपये उकळले जात असल्याचा आरोप केला. पोलीस विभाग अवैध धंद्यातून पैसे जमा करत असून त्यातील काही वाटा मुंबईलाही पाठवत असल्याचा आरोप दानवेंनी केला होता. या आरोपांमुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली होती.

मनोज लोहिया संभाजीनगरचे नवे 'सीपी': अंबादास दानवे यांच्या आरोपानंतर चार दिवसांनी गृह मंत्रालयाने पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची संभाजीनगर शहराच्या पोलीस आयुक्त पदावरून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी शहर पोलीस आयुक्तपदी मनोज लोहिया यांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, मनोज लोहिया हे जालन्यातील रहिवासी आहेत. त्यांनी संभाजीनगर शहरात 'एसीपी' म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी संभाजीनगर ग्रामीणच्या 'एसपी' पदावरही काम केले आहे. त्यांनी यापूर्वी मराठवाड्यातील परभणी येथे 'एसपी' आणि नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. शहरातील 'एसीपी' पदावर असताना त्यांनी जनतेशी चांगला संपर्क साधला होता. मनोज लोहिया यांची पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण नवे विशेष महानिरीक्षक:दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांना मुंबईतील जबाबदारी दिली गेली. त्यांना मुंबईतील राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागात विशेष पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली. आता छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक म्हणून मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण पदभार सांभाळणार आहे. डॉ. चव्हाण यांनी 18 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील 'एसीपी' पदावरही काम केले आहे. यासह चव्हाण यांनी लातूर आणि जालन्यात देखील उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांना मराठवाड्याचीही चांगली माहिती आहे.

हेही वाचा:Maharashtra Weather Update: राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, काही भागात गारपिटीचा जोर वाढण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details