मुंबई- राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष भाजप वेळोवेळी अनेक टीका करत असल्याचे पाहायला मिळते, यावर सरकारमधील मंत्री देखील जशास तसं उत्तर देतात. यामध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नव्या ट्रान्सफर मंत्रालयाची स्थापना झाली असल्याची खोचक टीका ट्विटरवरुन सरकारवर केली आहे.
'ट्रान्सफर मंत्रालय..! महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना' - Chandrakant patil on maha govt
ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री हे कोणी एक दोन नाहीत, तर अनेक आहेत. या मंत्रालयाचं 'बजेट' नाही... 'टार्गेट' असतं, अशी टीका करत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. नाव आहे ट्रान्सफर मंत्रालय, मंत्री हे कोणी एक दोन नाहीत, तर अनेक आहेत. या मंत्रालयाचं 'बजेट' नाही... 'टार्गेट' असतं, अशी टीका करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
याआधी राज्यातील मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यावरुन भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. चंद्रकांत पाटलांची ही मागणी म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’, असा घणाघात हसन मुश्रीफ यांनी केला होता. यावर आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर ट्रान्सफर मंत्रालय म्हणून पाटील यांनी टीका केली आहे. त्यावर महाविकास आघाडी नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं गरजेचे ठरेल.