महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime: तृतीयपंथीची दादागिरी थांबेना; प्रवाशाला मारहाण करून हिसकावला मोबाईल

मुंबईत लोकलच्या पुरुषांच्या डब्यांमध्ये तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे मागताना दिसून येतात. त्याचप्रमाणे मुंबईच्या बीकेसी येथील रस्त्यावर देखील असाच भयानक प्रकार घडला आहे. तृतीयपंथींनी एका नागरिकाला चपलेने मारहाण करून त्याच्याजवळ असलेला मोबाईल हिसकावल्याचा धक्कादायक प्रकार बीकेसी परिसरात घडला आहे.

Mumbai Crime
तृतीयपंथीची दादागिरी थांबेना

By

Published : Feb 20, 2023, 4:34 PM IST

मुंबई :वांद्रे कुर्ला संकुल परिसरात घडलेल्या या घटनेची मुंबई पोलिसांनी दखल घेतली. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस तृतीयपंथीयांनी दिसत आहे. पश्चिम उपनगरात तृतीयपंथींकडून ऑटो रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडील मोबाईल सारख्या मौल्यवान वस्तू हिसकावल्या जात असल्याचा धक्कादायक घटना घडत आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कधी घडली आहे, याबाबत माहिती पुढे आली नाही. अजित नावाच्या एका ट्विटर हँडल वरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओची मुंबई पोलिसांनी दखल घेतली. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


मारहाणीबाबतचा व्हिडीओ शेअर : ट्वीटरवर अजित नावाच्या एका ट्विटर अकाउंट वरून तृतीयपंथींच्या मारहाणीबाबतचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. ट्विट केलेल्या व्हिडीओत तृतीयपंथी एक नागरिकाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तसेच त्यांनी त्या नागरिकाजवळील मोबाईल हिसकावला असल्याचा आरोप नागरिकाने केला आहे. याप्रकरणी केलेल्या ट्विटवरून या प्रकरणाला वाचा फुटली आहे. यासंदर्भात केलेल्या ट्वीटची मुंबई पोलीस आणि दखल घेतलेली असून संबंधित तृतीयपंथींवर कारवाई करणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

प्रवाश्यांना शिवीगाळ:अजित नावाच्या ट्विटर हँडलवरून मात्र या घटनेबाबत संताप व्यक्त केला गेला आहे. संबंधित मारहाणीचा व्हिडिओ शेअर करत त्या ट्विटर हँडलवरून टी जंक्शन पोलीस स्थानकापासून 200 मीटर अंतरावर ही घटना घडली. मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करणारी पोस्ट करण्यात आली आहे. तसेच या ट्विटमधून मुंबई पोलीस व्हीव्हीआयपी सुरक्षा पुरवण्यात कदाचित व्यस्त असतील. आश्चर्यकारक आहे की, त्यांना या घटनेबद्दल काहीच माहिती नाही, असे नमूद करण्यात आले आहे. इतर प्रवाशाकडूनही त्यांनी मोबाईल हिसकावल्याचे या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसत आहे. याबरोबच प्रवाशांना अश्लील शिवीगाळ केली जात असल्याचे देखील या व्हिडीओतून समोर येत आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई पोलिसांनी संबंधित तृतीयपंथीयांचा शोध सुरू केला आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी सांगितलेले आहे.

हेही वाचा:Shiv Sena Whip : ठाकरे गटालाही आमचा व्हीप लागू असणार -भरत गोगावले

ABOUT THE AUTHOR

...view details