महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले 'ट्राम'चे दर्शन - TRAM

'बेस्ट'ची बंद पडलेली 'ट्राम' नागरिकांना पाहण्यासाठी एप्रिल महिन्यात ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. यासाठी बंद पडलेल्या 'ट्राम'ला रंगरंगोटी करुन नवे रुपही देण्यात आले.

आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले 'ट्राम'चे दर्शन

By

Published : Apr 20, 2019, 7:42 AM IST

मुंबई - 'बेस्ट'ची बंद पडलेली 'ट्राम' नागरिकांना पाहण्यासाठी एप्रिल महिन्यात ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. यासाठी बंद पडलेल्या 'ट्राम'ला रंगरंगोटी करुन नवे रुपही देण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने आता या ट्रामचे दर्शन घ्यायला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

मुंबईची लाईफलाईन म्हणून बेस्टची ओळख आहे. बेस्टची परिवहन सेवा सध्या बसच्या माध्यमातून प्रवाशांना उपलब्ध असली तरी ही सेवा सुरुवातील ट्रामच्या माध्यमातून दिली जात होती. ट्राम बस ३१ मार्च १९६४ पासून बंद करण्यात आली. काही कालावधीनंतर मुंबईतील ट्रामचे रूळही दिसेनासे झाले. फोर्ट येथे रस्त्याचे काम सुरू असताना खोदकामा दरम्यान ट्रामचे रूळ आढळून आले होते. त्यानंतर ट्रामचे जतन करण्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीनुसार पालिकेने आजच्या पिढीला ऐतिहासिक ट्रामची ओळख व्हावी यासाठी भाटिया गार्डनमध्ये 'ट्राम' ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ट्रामचा डबा रबाळे येथील अँन्थोनी गॅरेज येथे तयार करण्यात आला आहे. दीड महिन्यांच्या अथक परिश्रमाने ट्रामचा नवीन डबा तयार करण्यात आला आहे.

आचारसंहितेच्या कचाट्यात अडकले 'ट्राम'चे दर्शन

'ट्राम'चा प्रवास

  • - ९ मे १८७४ रोजी घोड्यांद्वारे ओढली जाणारी पहिली ट्राम मुंबईमध्ये धावली. सुरुवातीला ट्रामच्या तिकीटाचा दर हा तीन आणे होता. सुरुवातीला छापील तिकीट नव्हते. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादानंतर तिकीटाचा दर दोन आणे झाला. त्यानंतर काही महिन्यांनी तिकिटे छापण्यात आली.
  • - १९०५ मध्ये 'बेस्ट' म्हणजेच 'बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय अँड ट्राम'वे कंपनीची स्थापना झाली. १९०७ मध्ये घोड्यांच्या सहाय्याने ओढल्या जाणार्‍या ट्राम बंद करण्यात आल्या. त्यानंतर मुंबईमध्ये पहिली इलेक्ट्रीक ट्राम धावली.
  • - १९२६ मध्ये डबल डेकर ट्रामही शहरात आली. कंपनीने शहरामध्ये बससेवा सुरू करण्यासाठी निर्णय घेतला. १५ जुलै १९२६ मध्ये
  • शहरात पहिली बस अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या रस्त्यावर धावली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details