महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर 4 तासानंतर मध्य, हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा धीम्या गतीने सुरू

हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी वडाळा ते वाशी दरम्यान 18 बसेस सोडण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा धीम्या गतीने सुरू

By

Published : Aug 3, 2019, 7:08 PM IST

मुंबई- सायन ते कुर्ला दरम्यान दुपारपासून ठप्प असलेली लोकल सेवा अखेर 4 तासानंतर संध्याकाळी सुरू झाली. त्यामुळे परतीच्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. संध्याकाळी 4 वाजून 43 मिनिटांनी कुर्ला येथून कल्याणला लोकल रवाना झाली. सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 6 वाजून 21 मिनिटांनी जलद लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे.

सीएसएमटी ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक संध्याकाळी 5.40 वाजता सुरू करण्यात आली. हार्बर मार्गावर चुनाभट्टी ते सायन दरम्यान पाणी साचल्याने वडाळा ते वाशी लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तर वाशी आणि पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे, गोरेगाव हार्बर सेवा सुरू आहे.

रेल्वेच्या मदतीला बसच्या जादा गाड्या -

हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी वडाळा ते वाशी दरम्यान 18 बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर वाशी-मुलुंड मार्गावर 50, 27, 453 नंबरच्या एकूण 25 जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details