मुंबई - 1107 प्रवाशांना घेऊन खास रेल्वेगाडी मंगळवारी मुंबई मध्य स्थानकातून दिल्लीकडे रवाना झाली. रेल्वेने प्रवासी सेवा पुन्हा सुरू केल्यावर मुंबईतून सुटली जाणारी ही पहिली रेल्वे आहे. प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, यासाठी मुंबई पोलीस दल व रेल्वे पोलीस दल कार्यरत होते.
देशाची लाईफलाइन पुन्हा रुळावर, मुंबईतून दिल्लीला रेल्वे रवाना - mumbai latest corona update
1107 प्रवाशांना घेऊन खास रेल्वेगाडी मंगळवारी मुंबई मध्य स्थानकातून दिल्लीकडे रवाना झाली. रेल्वेने प्रवासी सेवा पुन्हा सुरू केल्यावर मुंबईतून सुटली जाणारी ही पहिली रेल्वे आहे.

रेल्वे कर्मचार्यांनी प्रवाशांना सुव्यवस्थित पद्धतीने पुढे जाता यावे म्हणून स्थानकाच्या बाहेर आणि चौकांच्या बाहेर चिन्हांकीत करून प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली. रेल्वेस्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची माहिती घेतली. प्रवाशांना विचारले गेले की, त्यांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड केले आहे का? त्यापैकी बर्याच जणांनी होकारार्थी उत्तर दिले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस आणि रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांनी मुंबई मध्य रेल्वे स्थानकावर कडक पहारा ठेवला आणि प्रवाशांना सुरक्षित अंतर राखून रेल्वेमध्ये चढण्याची परवानगी देण्यात आली. प्रवाशांचे रेल्वेत चढण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंग केले गेले.