क्युआर कोड पेमेंट पद्धतीने दंड घेता येणार मुंबई: गेल्या काही घटनांच्या माध्यमातून तिकीट तपासणाऱ्या टीसीला प्रवाशांकडून शिवीगाळ आणि मारझोडीचे प्रकार समोर आले आहे. अशा घटनांना रोखण्यासाठी तिकीट तपासणाऱ्या टीटीला (तिकीट तपासनीस) बॉडी कॅमेरा दिला गेला आहे. बॉडी कॅमेराबॉडी कॅमेराचा फायदा तिकीट तपासणी करताना होणार आहे. गैरवर्तन आणि हिंसा करणाऱ्यांवर आळा बसणार आहे. तिकीट तपासणीत पारदर्शकता देखील येणार आहे. यातून रेल्वेचा महसूल वाढण्याची शक्यता आहे.
देशात आपल्याला केंव्हाही कुठेही प्रवास करायचा असेल तर सोपा आणि परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे प्रवास आहे. मात्र बहुतेक वेळा रेल्वे प्रवास दरम्यान अनेक प्रवासी याचा गैरफायदा देखील घेत असतात. एवढेच नाही तर विना तिकीट प्रवास देखील करत असतात.
हे आहेत कॅमेराचे फायदे- बॉडी कॅमेराची खासियत ही आहे, की चार्जिंग न करता सलग दहा तास बॉडी कॅमेरा कार्यरत राहतो. यात हाय क्वालिटी व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे. वेगळे मेमरीकार्ड देखील घालून स्टोरेज वाढविता येते. क्युआर कोड पेमेंट पद्धतीने तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून तिकीट तपासणी प्रक्रियेत पेमेंट घेता येणार आहे. रोखीचे व्यवहार न करता थेट अॅपच्या माध्यमातून कॅशलेस पद्धतीमुळे व्यवहार सुरळीत होणार आहे.
नो बिल नो पेमेंट - रेल्वे प्रवासादरम्यान टीसी आणि प्रवासी यांच्यात उद्भवणारे वाद रोखण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवासात छोटे-मोठे गुन्हे घडत असतात. मोबाईल चोर व पिशव्या चोर यावर देखील नियंत्रण ठेवता येणार आहे. रेल्वेमध्ये प्रवासावेळी विना परवाना वेंडर खाद्यपदार्थ व शीत पेय विक्री करत असतात. या बॉडी कॅमेरामुळे विना परवाना विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून बंदी आणता येणार आहे.
आपण जर तिकीट घेतले तर त्या तिकिटाच्या पैशातून रेल्वेला महसूल मिळतो. त्या महसुलामधूनच आम्ही तुम्हाला चांगल्या रेल्वेच्या बाबतच्या सुख-सुविधा देऊ शकतो. रेल्वे प्रवास करताना विना तिकीट प्रवास करू नका-सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे
बिल घ्या- सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे म्हणाले, की परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ विकत घ्या. कोणी जास्त दराने विकत असल्याची शंका असेल तर बिल घ्या. नो बिल नो पेमेंट अशी रेल्वेची संकल्पना आहे. रेल्वेत प्रवास करताना पास, जनरल तिकीट, आरक्षण तिकीट एसी किंवा स्लीपर कोच तिकीट घेणे गरजेचे आहे. तिकीट तपासणाऱ्यांना सहकार्य करा.
हेही वाचा-
- AC Local Trains : मुंबईत एसी लोकलला भरभरून प्रतिसाद, रेल्वेला 32 कोटींचा महसूल
- Konkan Railway : कोकणातील रेल्वे तिकिटांचा काळाबाजार जोरात; रिजर्वेशन एका मिनिटात फुल
- Ganeshotsav 2023 : कोकणातला गणेशोत्सव, रेल्वे प्रवासावर दलालांचा डल्ला, मनसे आमदारांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे धाव