मुंबई - ईशान्य मुंबईतील भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी नुकतीच भांडुप स्टेशन पश्चिम येथील वाहतूक समस्यांसंदर्भात भांडुपकरांची भेट घेतली. यावेळी 'आम्ही भांडुप कर' या तरुणांच्या टीमने त्यांना वाहतूक समस्येची अडचण सांगितली. यावर खासदारांनी वाहतूक समस्या सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू व त्यावर पर्यायी मार्ग काढून स्थानकाच्या बाहेरील समस्या सोडवू असे सांगितले.
नवनिर्वाचित खासदारांसमोर भांडुपकरांनी वाचला वाहतूक समस्येचा पाढा - नगरसेविका साक्षी ताई दळवी
भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी नुकतीच भांडुप स्टेशन पश्चिम येथील वाहतूक समस्यांसंदर्भात भांडुपकरांची भेट घेतली. यावेळी 'आम्ही भांडुप कर' या तरुणांच्या टीमला खासदारांनी वाहतूक समस्या सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करू व त्यावर पर्यायी मार्ग काढून स्थानकाच्या बाहेरील समस्या सोडवू असे सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून 'आम्ही भांडुपकर', या तरुणांनी तयार केलेल्या एका ग्रुपने रिक्षा समस्या व बस समस्या यांवर तोडगा काढण्यासाठी, रोज सायंकाळी 6 ते 11 या वेळेत आपल्या सवडीनुसार भांडुपकरांना रिक्षाची व्यवस्था होईल याची काळजी घेत होते. या स्थानकावर फेरीवाले व रिक्षांच्या अवास्तव रांगांमुळे येथून पायी चालणेही अवघड होऊन जाते. यावर प्रशासन वेळोवेळी प्रयत्न करत असले तरी फेरीवाले फुटपाथवर ठाण मांडून बसतात. त्यामूळे बस वाहतुकीलादेखील मोठी समस्या होते. या समस्येला तोंड देण्यासाठी किरण गायचोर व त्यांच्या मित्रमंडळींनी हा ग्रुप तयार करून नागरिकांची प्रवासाची व्यवस्था केली होती.
भांडुपकरांची भेट घेत्यावळी खासदार मनोज कोटक यांच्यासोबत स्थानिक शिवसेना आमदार अशोक पाटील व विभागाच्या स्थानिक नगरसेविका साक्षी ताई दळवीसुद्धा उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित एस विभागाच्या महानगरपालिकेचे अधिकारी आरटीओ यांना खासदारांनी या समस्येविषयी सूचना केल्या. त्यानूसार वाहतूक समस्या लवकरात लवकर सोडण्यात येईल, असे महानगरपालिका व वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.