महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : वाहतूक पोलिसाला भरधाव दुचाकीने उडवले; पोलीस गंभीर - वाहतूक पोलिसाला उडवले बातमी

वाहतूक पोलीस शरद नाना पाटील हे कुलाबा परिसरामध्ये रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करत होते. दरम्यान, त्यांच्या समोरुन एक दुचाकी आली. त्यावर 3 तरुण स्वार होते. शरद पाटील यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.

traffic-police-hit-by-bike-in-mumbai
traffic-police-hit-by-bike-in-mumbai

By

Published : Jan 13, 2020, 8:45 PM IST

मुंबई- मोटर सायकलवरुन विनापरवाना 'ट्रिपल सीट' प्रवास करणाऱ्यांनी कुलाबा परिसरात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला धडक दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये पोलीस गंभीर जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी त्या तिघांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.

वाहतूक पोलिसाला दुकाचीस्वाराने उडवले

हेही वाचा-रतन टाटांविरोधातील अब्रुनुकसानीचा खटला नस्ली वाडिया यांनी घेतला मागे

वाहतूक पोलीस शरद नाना पाटील हे कुलाबा परिसरामध्ये रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करत होते. दरम्यान, त्यांच्या समोरुन एक दुचाकी आली. त्यावर 3 तरुण स्वार होते. शरद पाटील यांनी या तरुणांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या तरुणांनी गाडी न थांबवता त्यांच्या अंगावर घातली. या दुर्घटनेत शरद पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेश चव्हाण, आकाश राठोड व गोविंद राठोड अशी अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details