महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kurla Kalina Traffic : कुर्ला-कलिना आणि बीकेसी परिसरातील वाहतूक सुरळीत होणार, एमएमआरडीएची उच्च न्यायालयात माहिती - Petition to the High Court against road stones

मुंबई शहरात रस्ते वाहतूक मोठी समस्या आहे. कुर्ला कलिना, बीकेसी परिसरातील रस्त्यावरील खड्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचीकेवर सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला, न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठांसमोर सुणावनी झाली. एमएमआरडीएने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे.

High Court
High Court

By

Published : Jan 28, 2023, 3:40 PM IST

मुंबई :या संदर्भातील जनहित याचिका आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दाखल केली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 8 मार्च रोजी होणार आहे. एमएमआरडीएने सन 2016 मध्ये एससीएलआर विस्तारीकरणाचे काम सुरू केले होते. 2019 पर्यंत हे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही काम कासवाच्या गतीने सुरू होते. मार्च 2022 पर्यंत मुदत वाढवून SCLR विस्ताराचे केवळ 50% पूर्ण झाले. कुर्ला सीएसटी रस्त्यावर बांधकामासाठी अनेक खड्डे खोदले गेले. त्यामुळे सीएसटी कलिना ते कुर्ला, आणि सीएसटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रस्ता, जुन्या गाड्यांचे भंगार तसेच प्लायवूडच्या दुकानेने अर्ध्या रस्त्याला वेढले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक समस्या निर्माण होत आहे.

उच्च न्यायालयात जनहित याचिका :आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी ज्येष्ठ वकील मोहम्मद जैन खान यांच्यामार्फत अनेकवेळा संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. अखेर आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी एससीएलआर वाढवून बांधकामाची मागणी केली. या संदर्भात 2021 साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या जनहित याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मुंबई महापालिकेने जुजबी कारवाई केली मात्र, वाहतूककोंडीची समस्या तशीच राहिली.

पुढील सुणावणी 8 मार्च रोजी :एमएमआरडीएने ग्रँड हयात हॉटेल ते अहमद रझा चौक या 1.8 किमी लांबीच्या एससीएलआर विस्ताराचा पहिला टप्पा एप्रिल 2022 पर्यंत चालू करण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख ज्येष्ठ वकील मोहम्मद झैन. खान यांनी 1.8 किमी SCLR विस्ताराचा पहिला टप्पा त्वरित सुरु करण्याची मागणी करणारा अंतरिम अर्ज 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. 27 जानेवारी 2022 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान MMRDA ने आपल्या विधानात म्हटले आहे की, फेब्रुवारी 2023 च्या अखेरीस, ग्रँड हयात हॉटेल ते अहमद रझा चौक आणि BKC ते LBS जंक्शन पर्यंत SCLR विस्ताराचा पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरु केला जाईल. या याचिकेवर पुढील सुणावणी 8 मार्च 2023 होणार आहे.

हेही वाचा -IAF Fighter Jets Crashed: वायूसेनेच्या दोन विमानांचा अपघात.. एक मध्यप्रदेशात तर दुसरे पडले राजस्थानात, एक वैमानिक ठार

ABOUT THE AUTHOR

...view details