मुंबई: या मोर्चाचा मार्ग हा राजा बडे चौक येथून गडकरी चौक, गोखले रोड, पोर्तुगिज चर्च चौक, जाखादेवी चौक, गोपीनाथ चव्हाण चौक, डावे वळण घेवून काकासाहेब गाडगीळ मार्गाने सेनापती बापट असा असेल. मार्गावरील ब्रिजच्या खालून सेनापती बापट मार्ग दक्षिण वाहिनी मार्ग, महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ मैदान असा जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहन चालक आणि रहिवाशी यांना गैरसोय होवू नये. याकरीता गोर्चाच्या मार्गावरील व लगतच्या मार्गावरील वाहतुक ही मोर्चा सुरु झाल्यापासून ते मोर्चा संपेपर्यंत मोर्चाच्या मार्गक्रमणाप्रमाणे आवश्यकतेनुसार टप्याटप्याने बंद व सुरू करण्यात येणार आहे.
मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार वाहतूक: आज सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार खालील नार्गावरील वाहतूकीचे नियमन व नियंत्रण करण्यात येणार आहे. एन. सी. केळकर रोड, राम गणेश गडकरी चौकापर्यंत गोर्चा सुरु झाल्यापासून मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार बंद आणि सुरु करण्यात येणार आहे. एन. सी. केळकर रोडला जोडणारे एम. बी. राऊत रोड आणि केळूस्कर रोड हे मोर्चा सुरु मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार बंद व सुरु करण्यात येणार आहे. गोखले रोड हा राम गणेश गडकरी चौक ते गोपीनाथ चव्हाण चौकापर्यंत मोर्चा सुरु झाल्यापासून मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार बंद व सुरू करण्यात येणार आहे.
वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद आणि सुरु:हनुमान मंदिर सर्कल येथून एस. के. बोले रोडने गोखले रोडवरील पोर्तुगिज चर्च जंक्शनकडे जाणारी वाहतुक ही गोखले रोडवरील मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार आवश्यकतेप्रमाणे बंद आणि सुरु करण्यात येणार आहे. हनुमान मंदिर सर्कल येथून कबूतरस्थाना मार्गे भवानी शंकर रोडने गोखले रोडवरील गोपीनाथ चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतुक ही गोखले रोडवरील मोर्चाच्या मार्गक्रमणानुसार आवश्यकतेप्रमाणे बंद व सुरु करण्यात येणार आहे. जनतेस पोहचणारा धोका, अडथळा तसेच गैरसोय टाळण्याकरीता आणि पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांनी निर्देश दिले आहेत.