मुंबई Mumbai Traffic Police : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Diwas 2023) 6 डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीवर साजरा होणार आहे. या दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं येतात. त्यामुळं वाहतुकीत बदल करून गैरसोय टाळण्याचे उपाय मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने केले आहेत.
असा असणार मार्ग :स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग हा सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत वाहतुकीकरता बंद राहणार आहे. एस के बोले रोड उत्तरवाहिनी सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगीज चर्च जंक्शनपर्यंत एक दिशा मार्ग राहील. तर रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज रोड, केळुसकर रोड, दक्षिण आणि केळुस्कर रोड, उत्तर एम बी राऊत मार्ग हा वाहतुकी करता पूर्णपणे बंद राहणार आहे. टी एच कटारिया मार्ग हा एलजी रोडच्या शोभा हॉटेल जंक्शन ते आसावरी जंक्शनपर्यंत वाहतुकीस बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या माहीम जंक्शन ते हर्डीकर जंक्शन, एल जे रोडच्या माहीम जंक्शन ते गडकरी जंक्शन, गोखले रोडच्या गडकरी जंक्शन ते धनमिल नाका, सेनापती बापट मार्गाच्या माहीम रेल्वे स्थानक ते वडाचा नाका, दादर ड्युटी सर्कल ते टिळक ब्रिजवर, वीर कोतवाल गार्डन ते संपूर्ण एन सी केळकर रोड हे अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.